जिल्हा न्यायालयाबाहेर फ्री स्टाइल

जिल्हा न्यायालयाबाहेर फ्री स्टाइल
नणंद भावजयींनी झिंज्या उपटल्या

सिडको  : विशेष प्रतिनिधी
पतीच्या निधनानंतर पत्नीने सासरच्या मालमत्तेत हिस्सा मागीतल्याच्या वादातून जिल्हा न्यायालयाच्या बाहेर दोन कुटुंबीयांमध्ये फ्री स्टाइल हाणामारी झाली. महिलेने हिस्सा मिळावा म्हणून कोर्टात केस दाखल केलेली आहे. मात्र, सासरची मंडळी हिंस्सा देण्यास तयार नाही. काल कोर्टात तारीख होती. त्यावेळी न्यायालयाच्या बाहेर आलेल्या महिलेच्या सासर आणि माहेरच्या मंडळींमध्ये तुफान हाणामारी झाली. नणंद आणि भावजय यांनी एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तर पुरुष मंडळींनीही एकमेकांना अश्लील शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आवारात पोलिस असताना पोलिसांसमोरच ही तुंबळ हाणामारी झाली. यावेळी काही बघ्यांनी हाणामारीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्याने तो तुफान व्हायरल झाला.

Bhagwat Udavant

Recent Posts

नादच खुळा: 9 नंबरसाठी पठ्ठयाने मोजले इतके लाख

       नादच खुळा: 9 नंबर साठी पठ्ठयाने मोजले इतके लाख   पंचवटी :…

9 hours ago

गरिबांचा कैवारी

गरिबांचा कैवारी प्रेषित येशू ख्रिस्ताला सुळावर दिल्याचा शुक्रवार हा दिवस एक दु:खद दिवस मानला जातो.…

13 hours ago

आधी तिच्यावर केले प्रेम अन नंतर त्याने केले असे काही….. नेमके काय घडले?

आधी तिच्यावर केले प्रेम अन नंतर त्याने केले असे काही..... नेमके काय घडले? सिन्नर :…

13 hours ago

कांदा निर्यात शुल्क वेळेवर रद्द न केल्याने कांद्याचे बाजार भाव पडले : राजू शेट्टी

कांदा निर्यात शुल्क वेळेवर रद्द न केल्याने कांद्याचे बाजार भाव पडले राजू शेट्टी यांचा आरोप…

1 day ago

केवळ चर्चा, बोलणी कधी?

केवळ चर्चा, बोलणी कधी? शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…

1 day ago

मालेगावच्या त्या हॉटेलमध्ये भाजीत आढळले झुरळ

नांदगाव: प्रतिनिधी मालेगाव येथील हॉटेल शिवा पंजाब येथे भाजीमध्ये झुरळ आढळून आले या संदर्भात व्यवस्थापक…

2 days ago