‘त्या’ प्रेमीयुगलाच्या आत्महत्येआधीचा मित्राचा कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

त्या प्रेमीयुगलाच्या आत्महत्येआधीचा मित्राचा कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

मनमाड: आमिन शेख

मनमाड नजीक असलेल्या वंजारवाडी येथील उज्वला खताळ व ज्ञानेश्वर पवार या प्रेमीयुगलाने  नांदगाव नजीक असलेल्या
श्रीक्षेत्र नस्तानपूर येथे रेल्वेखाली आत्महत्या केली आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. यात गावातील अनेकांची नावे होती. मात्र आत्महत्या झाल्यानंतर अनेक उलट सुलट चर्चा सुरू होत्या. मात्र आता या प्रेमीयुगलाने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या एका मित्राला कॉल केला होता. या कॉलची रेकॉर्डिंग सध्या सर्वत्र व्हायरल झाली असुन यात स्पष्टपणे आम्हाला कोणी कोणी त्रास दिला आणि आम्हाला न्याय द्या आमची रेकॉर्डिंग आमच्या घरच्या पर्यंत व पोलिसांपर्यंत पोहचवा, असे हे प्रेमीयुगुल फोनमध्ये बोलताना म्हणत आहे. वंजारवाडी येथील  या  प्रेमीयुगल जोडप्याने नांदगाव नजीक असलेल्या श्री श्रीक्षेत्र नस्तानपूर येथे रेल्वे खाली आत्महत्या केली मात्र या आत्महत्येनंतर अनेक तर्कवितर्क लावले गेले या महिलेने तर चक्क आमदार साहेब तुमच्या बहिणीला न्याय द्या अशी आर्त हाक देखील दिली आहे मात्र आत्महत्या करण्यापूर्वी या  प्रेमीयुगलाने त्यांच्या एका मित्राला कॉल केला होता. यामध्ये त्यांनी ज्यांनी ज्यांनी त्रास दिला या सर्वांची नावे घेत आपल्या मित्राला हा कॉल रेकॉर्ड कर आणि आमच्या घरच्यांना व पोलिसांना देऊन आम्हाला न्याय देण्यासाठी प्रयत्न कर अशी आर्त हाक दिली आहे मुळात ज्यांची ज्यांची नावे त्या सुसाईट नोट मध्ये होती त्या सर्वांवर नांदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन या प्रेमीयुगल जोडप्याला आत्महत्या करण्यासाठी मजबूर करणाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी केली आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

1 hour ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

1 hour ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

1 hour ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

2 hours ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

2 hours ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

2 hours ago