सिडको :
पती-पत्नीमध्ये झालेल्या कौटुंबिक वादातून अंबड औद्योगिक वसाहतीतील चुंचाळे येथील घरकुल याठिकाणी राहणार्या एका 32 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला. बादल गायकवाड असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. बादल गायकवाड हा अंबड येथील एका वजन काट्यावर हमालीकाम करत होता. सकाळी बारा वाजेच्या सुमारास त्याच्या पत्नीसोबत वाद झाल्याने बादल याने स्वतः गळफास लावून घेत आत्महत्या केली. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. दरम्यान, याप्रकरणी चुंचाळे एमआयडीसी पोलीस चौकीत नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मयत बादल गायकवाड यांच्या पश्चात पत्नी, आई, भाऊ, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…