अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
सिडको : विशेष प्रतिनिधी
शिंगाडा तलाव परिसरातील स्टार लाइन फर्निचर दुकानात फर्निचर खरेदीसाठी आलेल्या ग्राहकाची एक लाख रुपयांची बॅग चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी जनार्दन हरी खोटरे (वय 40 वर्षे, रा. महात्मानगर, पारीजातनगर, नाशिक) हे त्यांची पत्नी ज्योती खोटरे व मित्र महेंद्र देवचंद महाले यांच्यासह ‘स्टार लाइन फर्निचर’ या दुकानात फर्निचर खरेदीसाठी गेले होते. त्यांनी दुकानात सुमारे 30 हजार रुपये देऊन खरेदी केली. याचवेळी त्यांच्याकडील गुलाबी रंगाची बॅग, ज्यामध्ये एक लाख रुपयांची रोकड होती ती दुकानात विसरली गेली. बॅग हरवल्याचे लक्षात आल्यावर दुकानात शोध घेण्यात आला, मात्र, बॅग मिळून आली नाही. कोणीतरी अज्ञात चोरट्याने बॅग चोरून नेल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर जनार्दन खोटरे यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…