6 लाख 67 हजारांचा मुद्देमाल जप्त; सहा संशयितांना अटक
घोटी : प्रतिनिधी
शेतकर्यांच्या विहिरी व नदीपात्रातून वीजपंप चोरी करणार्या टोळीचा घोटी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सहा संशयितांना अटक केली असून, त्यांच्याकडून नऊ वीजपंप आणि गुन्ह्यात वापरलेली हुंडाई औरा कार असा एकूण 6 लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
10 ऑगस्टला खेडभैरव (ता. इगतपुरी) येथील शेतकरी ज्ञानेश्वर वाजे यांच्यासह अन्य दोन शेतकर्यांच्या नदीपात्रातील तीन मोटारी चोरीला गेल्या होत्या. याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हवालदार संतोष नागरे यांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत वैभव डहाळे, परमेश्वर बेंड कोळी, महेश डगळे, विनायक साबळे, महादू लोते आणि राहुल वारुंगसे या सहा संशयितांना ताब्यात घेतले. पोलीस कोठडीत कसून चौकशी केली असता त्यांनी इतर ठिकाणांहूनही वीजपंप चोरी केल्याची कबुली दिली.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हवालदार संतोष नागरे, दीपक सांगळे, भाऊसाहेब बिन्नर, सुनील पाटील, योगेश यंदे व प्रकाश यांच्या पथकाने केली.
Gang stealing electric pumps in Khedbhairav area nabbed.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…