सिडको : प्रतिनिधी
श्रावण महिन्यात कपालेश्वर मंदिर आणि रामकुंड परिसरात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमनासाठी विशेष व्यवस्था केली आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवार आणि शनिवार या दिवशी सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत कपालेश्वर मंदिर, रामकुंड व गंगाघाट परिसरातील काही मार्गांवर अत्यावश्यक सेवेची वाहने वगळता सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
श्रावण महिन्यानिमित्त नाशिक शहरासह जिल्ह्यातील विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने कपालेश्वर मंदिरात दर्शनासाठी आणि रामकुंड येथे स्नानासाठी येतात. त्यामुळे भाविक व वाहनांची मोठी गर्दी होऊन वाहतूक कोंडी तसेच अपघाताची शक्यता निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. श्रावणातील सोमवार आणि शनिवार या दिवशी वरील मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी राहणार आहे. मात्र, पोलिस सेवेतील वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका आणि अग्निशमन दलाची वाहने या निर्बंधांतून वगळण्यात
आली आहेत.
वाहतूक अधिसूचनेनुसार आवश्यकतेनुसार निर्बंधाच्या वेळेत किंवा व्यवस्थेत बदल करण्याचे अधिकार वाहतूक पोलिसांनी राखून ठेवले आहेत. भाविक आणि वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन पोलिस उपआयुक्त (मुख्यालय/वाहतूक) चंद्रकांत गवळी यांनी जारी केले आहेत.
या मार्गांवर वाहनांना प्रवेश बंद राहणार
श्रावणातील प्रत्येक सोमवार आणि शनिवारी सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत मार्गांवर वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. मालेगाव स्टॅण्डकडून श्री कपालेश्वर मंदिरकडे (रामकुंड) येणारा मार्ग. खांदवे सभागृहाकडून श्री कपालेश्वर मंदिरकडे (रामकुंड) येणारा मार्ग. सरदार चौकाकडून श्री कपालेश्वर मंदिर (रामकुंड)कडे येणारा मार्ग. ढिकले वाचनालयाकडून श्री कपालेश्वर मंदिर(रामकुंड)कडे येणारा मार्ग.
Vehicular entry banned in the Ramkund area on Shravani Mondays and Saturdays.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…