सिडको : विशेष प्रतिनिधी
ऐन दिवाळी सणाच्या अगोदर नवीन नाशिकमध्ये ठिकठिकाणी कचर्याचे ब्लॅक स्पॉट वाढल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. नागरिक तसेच वाहनचालकांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.
परिसरातील उत्तमनगर येथील बुद्ध विहाराच्या मागे मुख्य रस्त्यावर, फडोळ मळा ते अंबड गाव मुख्य रस्त्यालगत, उंटवाडी गावासमोरील सिटी लिंकच्या थांब्याजवळ, जुडीओ ते फडोळ मळा मुख्य रस्त्यावरील नाल्यालगत काही बेशिस्त नागरिक उघड्यावर कचरा टाकत असल्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
या समस्येकडे महापालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. महापालिकेने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन उघड्यावर कचरा टाकणार्या नागरिकांवर कारवाई करावी व येथील कचरा त्वरित साफ करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…