नाशिक

लासलगाव ग्रामपंचायतीची ‘माझी वसुंधरा’मध्ये गरुडझेप

विभागीय स्तरावर 50 लाखांचे बक्षीस जाहीर

लासलगाव : वार्ताहर
लासलगाव ग्रामपंचायतीने पर्यावरण संवर्धन व शाश्वत विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ‘माझी वसुंधरा 5.0’ अभियानात विभागीय स्तरावर यश मिळवले आहे. दहा हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या गटात लासलगाव ग्रामपंचायतीची निवड झाली असून, ग्रामपंचायतीला 50 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे.
‘माझी वसुंधरा’ हे भूमी, जल, वायू, अग्नी आणि आकाश या पंचमहाभूतांवर आधारित पर्यावरण संरक्षणाचे एकात्मिक अभियान असून, दि. 2 ऑक्टोबर 2020 पासून राज्यभर राबविण्यात येत आहे. राज्यातील 28,317 स्थानिक स्वराज्य संस्था या अभियानात सहभागी झाल्या आहेत. लासलगाव ग्रामपंचायतीने यापूर्वी ऑनलाइन सेवांबाबत राज्यपालांच्या हस्ते गौरव मिळवला असला, तरी विभागीय स्तरावर बक्षीस मिळवण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.
सन 2024-25 मध्ये राबविण्यात आलेल्या या अभियानाचा पाया तत्कालीन सरपंच अफजल शेख व ग्रामविकास अधिकारी एल. जे. जंगम यांनी घातला होता. पंचमहाभूतांवर आधारित प्रकल्पांची अंमलबजावणी, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व ऑनलाइन अपलोडिंग ही कामे शिस्तबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात आली. अभियानाच्या अंतिम टप्प्यात विभागीय तपासणी समितीच्या दौर्‍यावेळी विद्यमान सरपंच योगिता पाटील व अधिकारी एस. एच. बाविस्कर यांनी प्रभावी सादरीकरण करून प्रत्यक्ष तपासणी यशस्वीपणे पार पाडली. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत आयोजित पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी (दि.21) सकाळी 11 वाजता सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, वरळी येथे होणार आहे. या कार्यक्रमास विविध मंत्री व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या यशासाठी सरपंच योगिता पाटील, उपसरपंच रामनाथ शेजवळ यांच्यासह सदस्य जयदत्त होळकर, नानासाहेब पाटील, अफजल शेख, चंद्रशेखर होळकर, अश्विनी बर्डे, अमिता ब्रह्मेचा, अमोल थोरे, सायली पाटील, दत्ता पाटील, सुवर्णा जगताप, रेवती होळकर, पुष्पा अहिरे, संगीता पाटील, संतोष पलोड आणि ज्योती निकम तसेच तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी एल. जे. जंगम व विद्यमान अधिकारी एस. एच. बाविस्कर यांनी परिश्रम घेतले.

बक्षिसाच्या रकमेतून प्रस्तावित विकासकामे

50 लाख रुपयांच्या बक्षीस रकमेचा विनियोग पर्यावरणपूरक व शाश्वत विकास प्रकल्पांसाठी करण्यात येणार असून, त्यामध्ये पुढील कामांना प्राधान्य देण्यात येईल. यामध्ये हरित आच्छादन वाढविणे, मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण, स्मृतिवन, सार्वजनिक उद्याने, विद्यमान हरित क्षेत्रांचे संवर्धन व देखभाल, रोपवाटिका निर्मिती, जलसंवर्धन व परकोलेशन प्रकल्प, रेन वॉटर हार्वेस्टिंग उपक्रम, नदी, तळे व नाल्यांचे पुनर्जीवन, नूतनीकरणयोग्य ऊर्जा वापरास प्रोत्साहन, सौरऊर्जेवरील एलईडी दिव्यांची उभारणी, स्वच्छता व कचरा व्यवस्थापन सुधारणा, पर्यावरण जनजागृती व स्पर्धांमधील विजेत्यांना बक्षीस वितरण.

Garudazep in ‘Majhi Vasundhara’ of Lasalgaon Gram Panchayat

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पडोसन

पडोसन नावाचा विनोदी चित्रपट तुम्हाला सगळ्यांना आठवत असेलच.... एक -एक पात्र अतिशय विनोदी... तर अशीच…

3 hours ago

फुलोरा…

‘फार फार तर वारा बाहेरून येईल पण फुलून तर आतूनच यावे लागते..’ कविवर्य संजय चौधरी…

3 hours ago

श्रद्धा, ट्रेंड आणि माणूस

नुकताच फेसबुकवरील एका पेजवर डॉ. प्रज्ञावंत सरांचा लेख वाचनात आला. त्यांच्या लेखातील काही मुद्दे मनाला…

3 hours ago

आवडता कोपरा

खुणावतो का मला माहेरचा तो कोपरा, जरी असला आज, माझा संसार हसरा.... बंद कुपी असते…

3 hours ago

खंजीर आणि खाज

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तत्त्वांचा बाजार आणि सोयीच्या युतींचा सुकाळ झाला असून, एकेकाळचे कट्टर विरोधक आता…

3 hours ago

बांगलादेशमधील सत्तांतर

दक्षिण आशियातील राजकारणात पुन्हा एकदा मोठा बदल घडला आहे. बांगलादेशमधील नुकत्याच झालेल्या संसदीय निवडणुकीत दीर्घकाळ…

3 hours ago