नाशिक

वाहतूक कोंडी ठरली काळ, पण माणुसकी धावून आली वेळेवर!

मनमाडमध्ये रिक्षातच ऊसतोड महिलेची प्रसूती

मनमाड : प्रतिनिधी
विकासाच्या कितीही गप्पा मारल्या जात असल्या, तरी महामार्गावरील जीवघेणी वाहतूक कोंडी गरिबांच्या जीवावर कशी बेतू शकते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा मनमाडमध्ये आला. इंदूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर तासन् तास अडकून पडलेल्या एका ऊसतोड मजूर महिलेला रुग्णालय गाठणे अशक्य झाल्याने चक्क धावत्या रिक्षातच बाळंत व्हावे लागले. सुदैवाने आई आणि नवजात कन्या दोन्ही सुखरूप आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून मनमाड शहरातील इंदूर-पुणे महामार्ग हा बायपास करावा किंवा शहराच्या मध्यवर्ती भागातून उड्डाणपूल तयार करावा, अशी मागणी होत आहे. नुकतेच केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या मागणीवरून मालेगाव ते कोपरगावपर्यंत तब्बल 980 कोटी रुपयांचा चार पदरी सिमेंट महामार्ग मंजूर केला आहे. लवकरच त्याचे काम सुरू होणार आहे. मात्र, तोपर्यंत अजून किती गर्भवती महिलांना रस्त्यावर बाळंत व्हावे लागेल, असा प्रश्न केला जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नंदुरबार जिल्ह्यातील केलीपाणी येथील आवेश वडवे या ऊसतोड मजूर महिला आपल्या कुटुंबासह सोलापूरहून ऊसतोडणीचे काम संपवून घराकडे परतत होत्या. मनमाड शहरातून जाणार्‍या इंदूर-पुणे महामार्गावर पोहोचल्यावर त्यांना प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्यांच्या पतीने तत्काळ त्यांना रिक्षातून रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, या महामार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या मैलोन् मैल रांगा लागल्या होत्या. रुग्णवाहिका बोलावणे किंवा खासगी वाहनाने वेळेत उपजिल्हा रुग्णालय गाठणे अशक्य झाले होते. यावेळी रिक्षाचालकाच्या पुढाकाराने व स्थानिक व्यक्तीच्या मदतीने रिक्षातच बाळंतपण केले. सुदैवाने मायलेकी दोघीही सुखरूप आहेत.

रिक्षाचालकाचा देवदूत बनून पुढाकार

ऊसतोड महिलेची प्रकृती बिघडत असल्याचे पाहून रिक्षाचालक अमजद अत्तर यांनी माणुसकी दाखवत पुढाकार घेतला. सामाजिक कार्यकर्ते रितेश पगारे यांनी दुचाकीवरून समोरून येत असलेली वाहतूक बाजूला करत रिक्षाला वाट करून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वेदना असह्य झाल्या आणि रिक्षातच एका गोंडस चिमुकलीचा जन्म झाला.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

3 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

3 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

3 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

3 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

4 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

4 hours ago