राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

गॅस सिलिंडर आता 25 दिवसांनंतरच बुक होणार

गॅस जपून वापरण्याचे सरकारचे आवाहन

नवी दिल्ली :
घरगुती गॅस वापरणार्‍या ग्राहकांसाठी केंद्र सरकारने महत्त्वाची सूचना जारी केली आहे. गॅस जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. तेल विपणन कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या बुकिंग नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. नवीन नियमानुसार, आता दोन सिलिंडर बुक करण्यामध्ये किमान 25 दिवसांचे अंतर असणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयामुळे गॅसचा काळाबाजार रोखण्यास मदत होईल, असा दावा केला जात आहे.
युद्धामुळे एलपीजी गॅसचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. यामुळे हॉटेल, कंपन्यांसाठीच्या गॅसवर बंदी आणण्यात आली आहे. तसेच घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीदेखील 60 रुपयांनी वाढल्या आहेत. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे ग्राहकांकडून साठा करण्याची किंवा हे सिलिंडर हॉटेल व्यावसायिकांना दिले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. यामुळे अचानक कंपन्यांनी आधीचा 15 दिवसांचा वेटिंग पिरिएड आता थेट 25 दिवसांवर नेऊन ठेवला आहे.
7 मार्चपासून हे नवीन नियम लागू झाले आहेत. अनेकांकडे एकापेक्षा जास्त गॅस जोडणी आहेत. दोन सिलिंडर असलेल्यांकडे एक सिलिंडर रिकामा असतो. त्या ग्राहकांनी दुसरा सिलिंडर बुक करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तेव्हा 15 दिवसांचा मेसेज दाखविण्यात येत होता. परंतु 16-17 दिवस होऊनही सिलिंडर बुक होत नव्हता. अखेर 9 मार्चला कंपन्यांनी सिलिंडर डिलिव्हरीपासून 25 दिवसांचा गॅप असल्याचा मेसेज दाखविण्यास सुरुवात केली. यामुळे एखादा ग्राहक 25 दिवसांच्या आत बुकिंग करण्याचा प्रयत्न करेल, तर त्याचे बुकिंग सिस्टिम स्वीकारणार नाही. गॅस सिलिंडर मागणीमुळे वाढलेला दबाव कमी करण्यासाठी कंपन्यांनी ही खेळी खेळल्याचे सांगितले जात आहे.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

2 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

2 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

2 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

2 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

2 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

2 hours ago