आस्वाद

कर्तबगार महिला

अगं आई… काय सकाळी उठून स्वयंपाकघरात लगेच कामाला लागली आहेस…. नाही गं… आज इतके जण येणार लंचला… नको का लवकर लवकर लवकर आवरायला… हे बघ.. मी चिंचगूळ भिजत घालते. मस्त आंबट वरण करते. कालच बटाटे उकडून ठेवलेत फ्रिजमध्ये. डोसाभाजी आणि ओल्या नारळाची चटणी..फक्त खिरीचे कन्फ्यूजन आहे गं…दलियाची खीर करू का शेवयाची. मम्मूडी… माझी गं… मम्मूडी.. किती टेन्शन घेते… चिल्ल यार…..फ्रेंड्स आहेत ते. कोणी बॉस किंवा जुन्या काळातले खतरूड, खडूस. सुना मंडळींच्या चुका काढणारे लोकं नाहीत…. तू आधी शांत बस बरं. अगं, अगं, खांद्याला धरून अगदी स्वयंपाकघराच्या बाहेरच केलेस मला… बरं ठीके… चहा तरी टाकू दे की..आज नो काम ओन्ली आराम. अग, पण मला काही काम नाही केलं तर नाही गं करमणार… हात वळवळतात गं आम्हां बायकांचे. तेच मला चेंज करायचं आहे मॉम.. अग, पण हे तर नॉर्मल आहे आम्हां बायकांचे…कोणी जेवायला येणार म्हणलं की, लगेच प्लॅन करून पटकन स्वयंपाक करून हातावेगळं करायचं सगळं आणि स्वतः फ्रेश वगैरे होऊन त्यांच्याशी गप्पा मारायला तय्यार राहायचं.. मला माहिती नाहीये का…हा तुझं स्वभाव.. पण तोच तर आता बदलायचा आहे मला..आता तू फक्त आयुष्य एन्जॉय करायचं आहे आई.. अगं, असे काय मी जगावेगळे कष्ट उपसले का शेतात जाऊन पेरणी कापणी केली… का गुरढोेरं सांभाळली… का डोंगरावरून माती उपसून आणली… सामान्य आया जे करतात तेच मी केलं ना बाई.
नाही आई… आई ही कधीच सामान्य नसते… एका आईचे कष्ट मुलांच्या नजरेतून पहा तू… मग तुला समजेल मी काय म्हणते ते… आणि पटेल ही… बरं बाई…. तू म्हणतेस तसं… नुसतं मी म्हणते तसं नाही… खरंच तू आम्हा दोघा भावंडांना कसं वाढवलंस… आम्हाला माहीत नाही का… आणि बोलताबोलता लेकीचा आवाज भरून आला. ती चटकन उठून गेली लेकीजवळ….तिला हलकेच कुशीत घेऊन थोपटू लागली… बघता बघता स्वतःचा सगळा भूतकाळ डोळ्यांसमोरून तरळून गेला…
मनोज गेल्यानंतर त्याचे इलेक्ट्रिक सामानाचे दुकान, त्यातले किमती सामान 15 दिवसांतच दिरांनी विकून टाकले.. ती दुःखात चूर…. अचानक पडलेला हा घाव… पदरी दोन पोरं…. तिला वाटलं… पतीनिधन ही आपली परीक्षा आहे. पण खरी परीक्षा आत्ता कुठे सुरू होत होती… हे त्या बिचारीला कुठे माहीत होतं… एक महिन्यानंतर तिला सोसायटीतून नोटीस आली तेव्हा समजले की, हे आपलं राहतं घर गहाण पडलं आहे… दुकानातून काही इन्कम येईल म्हटलं तर एका महिन्यात दोन्ही दिरांनी मिळून दुकानाची पार वाट लावली होती. आतल्या समानासकट दिरांच्याच एका मित्राला परस्पर घर विकूनही टाकलं होतं… त्याचे किती पैसे आले… त्यात माझा वाटा किती… हे दिरांना विचारण्याचा प्रश्नच नव्हता… कारण दुकानाचा प्रश्न निकाली काढून… दीर आता तिच्या स्त्रीधनाकडे वळाले होते. एव्हाना परिस्थितीचा थोडासा अंदाज येऊ लागला होता तिला. तिला स्वतःची परवा नव्हती, पण पोटी असलेल्या दोन चिमण्या जीवांसाठी मात्र ती जीव तोडून, निकराने उभी राहिली… तिला उभे राहावेच लागणार होत. आणि हे माझे स्त्रीधन आहे.. माझ्या लग्नात माझ्या वडिलांनी मला दिलेले… यावर तुमचा, माझ्या सासरच्या कोणाचाही काडीचा अधिकार नाही… हे अगदी निक्षून सांगितले…. तेव्हाचा तिचा आवाज तिलाच आश्चर्यचकित करून गेला…. आणि हिमतीने ते स्वार्थाने लडबडलेले घर सोडून सिडकोमध्ये छोटंसं दोन खोल्यांचं घर घेतलं…. त्यातल्या त्यात जमेची बाजू म्हणजे तिची शाळेतली नोकरी पक्की होती…आणि मुलंही जाणते आणि समजूतदार… बस ह्या दोन आधाराने… तिने मजल-दरमजल करत आत्तापर्यंतची वाटचाल केली होती. मुलगी इंजिनिअर आणि मुलगा एमबीए…स्वतःच्या हुशारीवर झाले आणि आता तर उच्चपदस्थही. तिचे तर जीवन सफल झाले. मुलांच्या कर्तबगारीमुळे तिला धन्य धन्य वाटत होते आणि गेलेल्या आयुष्याबद्दल तिची काहीही तक्रारही नव्हती… ना राग… ज्याचा ज्याचा जो हिस्सा असतो… तो तो घेऊन जातो. सगळं न्याल तुम्ही.. पण माझ्या कपाळावरचं कातडं तर नेणार नाही ना ओढून….. त्याची तर माझी मीच जबाबदार आहे ना… असेल माझ्या नशिबात तर होईल सर्व ठीक… आणि माझं नशीब चांगलंच आहे… इतके धक्के पचवूनही तिने स्वतःच्या नशिबाला कधीही कोसले नाही की रडगाणे गायले नाही… तिला स्वतःच्या चांगल्या नशिबावर… प्रचंड विश्वास आणि मुलांच्या हुशारीवर यथार्थ अभिमान होता….
…आणि आता तर लेकीचे लग्नही झाले… परवाच मोठे पाच खोल्यांचे पेंट हाउस घेतले जावयांनी… वास्तुशांत झाली… ती अगदी तृप्त होती… माझ्या नशिबात तितकी ठोकर खाणं लिहिलं होतंच… असे मानून ती पुढे चालली होती… अत्यंत समाधानाने… पण मुलांच्या मनात… कोणाबद्दलाही… कधीही तिने आकस निर्माण केला नव्हता… पण मुलंही सर्व जाणून होती… आता तिला सुखाच्या राशीत लोळवायचं… हे जणू त्यांनी ठरवले होते…
आई…. तू शांतपणे बैस बरं या रेव्हॉलविंग चेअरवर… मी आज स्वतःच्या हाताने तुझा मसाज, फेसिअल… नंतर बॉडी मसाज आणि लास्टला हेअरस्टाइलपण करून देणार आहे…. बघ कशी दहा वर्षांनी तरुण दिसशील तू… ए बाई… नको गं… तुझे जे कोणी फ्रेंड्स येणारेत ना… ते हसतील मला… ती घाबरून बोलली… कोणी येणार नाहीये… तू छानपैकी तयार झालीस की एक र्ीीीिीळीश आहे तुला…. आणि थोड्याच वेळात… एक सुस्वरूप, देखणी… मध्यमवयीन स्त्री….आपल्या तरुण मुलीबरोबर…..आकाशवाणी केंद्रात… जाताना दिसली…..हो… कर्तबगार महिला…. यासंदर्भात तिची मुलाखत घेण्यासाठी… आकाशवाणी केंद्रामध्ये…..वार्ताहर नंबर लावून उभे होते….विषय होता… कर्तबगार महिला…

Working woman

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

18 hours ago

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…

18 hours ago

अफगाणिस्तानमधील 25 लाख मुली शिक्षणाविना!

ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…

18 hours ago

सुपर पॉवर सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…

19 hours ago

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…

19 hours ago

भूसंपादनावरून महासभा गाजली

पंचवीस वर्षांपासून शेतकर्‍यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…

19 hours ago