नाशिक

सिन्नरला सीएनजी कॅस्केड वाहनातून गॅसगळती

गुरेवाडी फाटा येथील एमएनजीएल पंपावरील घटना; कर्मचारी जखमी

सिन्नर : प्रतिनिधी
नाशिक-पुणे महामार्गावरील धोंडवीरनगर शिवारातील कृष्णनगर परिसरात सोमवारी रात्री सीएनजी गॅसगळतीची घटना घडल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. एमएनजीएलच्या ऑनलाइन सीएनजी पंपावर कॅस्केड वाहनात गॅस भरताना अचानक गळती सुरू झाली. या प्रकारात एक कर्मचारी गंभीर जखमी झाला असून, प्रसंगावधान राखत गॅसपुरवठा बंद केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
धोंडवीरनगर येथील कृष्णनगर परिसरातील एमएनजीएल कंपनीच्या ऑनलाइन सीएनजी पंपावरून विविध ऑफलाइन पंपांना कॅस्केड वाहनांद्वारे गॅस पुरवठा केला जातो. सोमवारी (दि. 20) रात्री सुमारे 10 वाजता एका सीएनजी कॅस्केड वाहनातील टाक्यांमध्ये गॅस भरण्याचे काम सुरू असताना अचानक नोझलमधून गॅसगळती सुरू झाली. गळतीमुळे झालेल्या मोठ्या आवाजाने परिसरात एकच गोंधळ उडाला.
यावेळी गॅस भरण्याचे काम करणारा विशाल संजय वारुंगसे (19, रा. डुबेरे, ता. सिन्नर) हा कर्मचारी घाबरून वाहनावरून खाली उडी मारताना गंभीर जखमी झाला. त्याचा पाय फ्रॅक्चर झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर पंपावरील वाहनचालक आणि नागरिकांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव घटनास्थळापासून दूर जाणे पसंत केले. काही कर्मचार्‍यांनी तातडीने इमर्जन्सी बटण कार्यान्वित करून गॅसपुरवठा बंद केला. मात्र, कॅस्केड वाहनातील सुमारे एक हजार किलो गॅस पूर्णपणे बाहेर पडेपर्यंत परिसरात भीतीचे वातावरण कायम होते. सिन्नर नगरपालिकेचा अग्निशमन बंब आणि सिन्नर पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.
या पंपालगतच इंधन पंप असून, परिसरात मोठी वस्ती आहे. त्यामुळे गॅसगळतीची माहिती मिळताच नागरिकांमध्ये घबराट पसरली. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर आणि गॅसगळती थांबल्यानंतरच स्थानिकांनी सुटकेचा
निःश्वास सोडला.

सुरक्षा उपायांवर स्थानिकांची नाराजी

घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाशी संपर्क साधून मदत मागितली. कंपनीकडून सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना पुरेशा प्रमाणात राबवल्या जात नसल्याचा आरोप स्थानिक रहिवासी विक्रम सोनवणे यांनी केला. या घटनेनंतर गॅसपंपावरील सुरक्षा व्यवस्थेची सखोल तपासणी करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

इमर्जन्सी बटणामुळे टळला अनर्थ

गॅसगळती सुरू झाल्यानंतर कर्मचार्‍यांनी तातडीने इमर्जन्सी बटण दाबून गॅस पुरवठा बंद केला. पंपालगत इंधन पंप आणि निवासी वस्ती असल्याने परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता होती. मात्र, वेळेवर केलेल्या उपाययोजनांमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याची चर्चा परिसरात
सुरू होती.

Gas leak from CNG cascade vehicle in Sinnar

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

2 days ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

2 days ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 days ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 days ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 days ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

2 days ago