तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू : नगराध्यक्षा
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर शहरातील खोदलेले रस्ते वेळेत पूर्ण न करणार्या ठेकेदारांना त्र्यंबक नगर परिषद प्रशासनाने मोठा दणका दिला आहे. कामे प्रलंबित ठेवल्यास दर दिवशी 25 हजार रुपये दंड आकारण्याची नोटीस प्रशासनाने बजावली आहे. अर्धवट कामांमुळे भाविक किंवा नागरिकांना इजा झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित ठेकेदारावर राहील, असा इशारा नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार यांनी दिला आहे.
त्र्यंबकेश्वर येथे आगामी सिंहस्थ कुंभमेळा नियोजनांतर्गत अंतर्गत रस्त्यांची कामे सुरू आहेत. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून या कामांमुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुढील आठवड्यात उत्तर भारतीय श्रावण महिना सुरू होत असल्याने भाविकांची गर्दी वाढणार आहे. रखडलेल्या रस्त्यांमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असून, भाविकांना मंदिरात जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्यातच पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत नगराध्यक्षा व मुख्याधिकार्यांनी कंत्राटदारांची तातडीची बैठक घेतली. विलंबाबद्दल दररोज 25 हजार रुपयांचा दंड ठोकण्यासोबतच, उघडे चेंबर किंवा गटारींमुळे दुर्दैवाने जीवितहानी घडल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, असे लेखी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे.
तसेच कंत्राटदारांनी वेळकाढूपणा केल्यास ठेका रद्द करून दुसर्या क्रमांकावरील एजन्सीला काम वर्ग केले जाईल, असा इशाराही देण्यात आला.
नोटीसचा धसका; पावसात काम
नगर परिषदेच्या या कडक इशार्याचा आणि दंडात्मक कारवाईच्या नोटीसचा थेट परिणाम दिसून आला असून, मंगळवारी मुसळधार पाऊस सुरू असतानाही कंत्राटदारांकडून वाहनतळ ते मंदिर रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे पाहायला मिळाले.
Contractors leaving roadworks incomplete to face a daily fine of ₹25,000!
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…