नाशिक

जेसीबीच्या धक्क्यामुळे गॅस पाइपलाइनला आग

आगीचे मोठे लोळ उसळत राहिल्याने परिसरात खळबळ

सिडको : विशेष प्रतिनिधी
सिटी सेंटर मॉल ते इंदिरानगर बोगदादरम्यान असलेल्या आर. डी. सर्कल परिसरात सोमवारी (दि. 22) सकाळी एका खाजगी बांधकाम व्यावसायिकाच्या जेसीबीमुळे एमएनजीएल कंपनीच्या गॅस पाइपलाइनला धक्का लागला. त्यामुळे आग लागल्याची घटना घडली. लेव्हलिंगचे काम सुरू असताना जेसीबीच्या बकेटचा फटका पाइपलाइनला बसला. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. यामुळे परिसरात एकच पळापळ उडाली.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली. त्यांच्या त्वरित कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, जळालेल्या गॅस पाइपलाइनची दुरुस्ती करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
दरम्यान, गोविंदनगर रस्त्यावरील आर. डी. सर्कल चौकात मंगळवारी सकाळी सुमारे दहा वाजेच्या सुमारास खोदकाम सुरू असताना जेसीबीचा धक्का लागून एमएनजीएल कंपनीची गॅस पाइपलाइन फुटल्याची घटना घडली. पाइपलाइन फुटताच तब्बल दहा ते पंधरा मिनिटे आगीचे मोठे लोळ उसळत राहिल्याने परिसरात खळबळ उडाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आर. डी. सर्कल चौकात सुरू असलेल्या एका गृहप्रकल्पासाठी रस्त्याच्या कडेला जेसीबीद्वारे खोदकाम केले जात होते. याच वेळी अचानक पाइपलाइन फुटून मोठा आवाज झाला. माहिती मिळताच एमएनजीएलचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि आवश्यक उपाययोजना करून परिस्थिती नियंत्रणात आणली. काही काळ परिसरात भीतीचे वातावरण होते. आवश्यक खबरदारी न घेतल्यामुळे ही घटना घडल्याची चर्चा असून, नागरिकांनी प्रशासनाने अशा कामांवर कडक देखरेख ठेवावी, अशी मागणी केली आहे.
गेल्या वर्षभरात सिडकोसह विविध भागात आतापर्यंत पाच ते सहा ठिकाणी एमएनजीएल कंपनीच्या गॅस पाइपलाइन
फुटल्याची किंवा आग लागल्याच्या पाच ते सहा घटना घडल्याचे सर्वश्रुत असतानाही एमएनजीएल कंपनीकडून निष्काळजीपणा दिसून येत असल्याच्या तक्रारी काही नागरिकांनी केल्या आहेत. भविष्यात घडणार्‍या या दुर्घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Gas pipeline caught fire due to JCB impact
 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

डोंगराळे बालिका अत्याचार-हत्याप्रकरणी आरोपीला फाशी

मालेगाव : प्रतिनिधी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचारवर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि निर्घृण खूनप्रकरणी येथील…

17 seconds ago

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

21 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

21 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

21 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

21 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

21 hours ago