नाशिक

सारूळ शिवारात जिलेटिन साठा जप्त

ग्रामीण पोलिसांची कारवाई; सात संशयितांना अटक

इगतपुरी : प्रतिनिधी
तालुक्यातील वाडीवर्‍हे पोलीस ठाणे हद्दीत सारूळ शिवारात अवैध जिलेटिनचा साठा जप्त केला. पोलीस पथकाने सात संशयितांना अटक करीत कारवाई केली.
अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीप्रमाणे 1 सप्टेंबरला वाडीवर्‍हे पोलीस ठाणे हद्दीतील सारूळ शिवारात काही ठिकाणी घरात, तसेच शेडमध्ये अवैध जिलेटिनसारख्या स्फोटक पदार्थांचा साठा असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार वाडीवर्‍हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे व पोलीस अधीक्षक कार्यालयाकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांच्या पथकाने नाशिक ग्रामीण श्वानपथक व बॉम्बशोधक पथकासह पंचांसमक्ष छापा टाकला. सारूळ शिवारात संशयितांच्या राहत्या घरामागील पत्र्याच्या शेडमध्ये अमोनियम नायट्रेटयुक्त जिलेटिनसारखे स्फोटक पदार्थांच्या कांड्या भरलेले बॉक्स आणि डेटोनेटर एकत्रितरीत्या आढळून आले. कारवाईत गोरख बाजीराव ढगे (वय 34, रा. सारूळ, ता. जि. नाशिक), विकास नवले (रा. सारूळ, ता. जि. नाशिक), ओंकार कैलास नवले (वय 23, रा. सारूळ, ता. जि. नाशिक), दीपक दशरथ क्षीरसागर (वय 32, रा. शिंगवे बाहुला, देवळाली कॅम्प), गौरव मोहन नवले (वय 32, रा. सारूळ), अमित अजमेरा (पूर्ण नाव माहीत नाही), कोठावदे (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली. वाडीवर्‍हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मथुरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंडे, उपनिरीक्षक अमोल सूर्यवंशी, एकनाथ भोईर, सुनील शिंदे, अंमलदार सुभाष धुळे, रावसाहेब शिंदे, जालिंदर खराटे, सचिन पिंगळ, सचिन कदम, तुषार कापडणीस, रविराज जगताप यांचे पथक तपास करीत आहेत.

95 हजारांचा साठा जप्त
कारवाईत जिलेटिनच्या कांड्या भरलेले 49 बॉक्स. त्यात एकूण 6,125 जिलेटिनच्या कांड्या, 2200 इलेक्ट्रिक डेटोनेटर, 150 मीटर डी. एफ. वायर असा एकूण 95,750 रुपये किमतीचा साठा जप्त केला.

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

9 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

9 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

10 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

10 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

10 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

10 hours ago