नाशिक

चाळीसगावचा डॉक्टर गर्भलिंग निदानसाठी नाशकात

शहरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश; पोर्टेबल मशिन जप्त

इनोव्हा कारचा वापर; न्यायालयात खटला दाखल

नाशिक : गोरख काळे
नाशकात थेट पोर्टेबल सोनोग्राफी मशिनद्वारे गर्भलिंग निदानच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, चाळीसगाव तालुक्यातील संशयित डॉक्टर इनोव्हा कारमधून गर्भलिंग निदानचे रॅकेट चालवत असल्याचा संशय आहे. इंदिरानगर पोलिसांनी इनोव्हा कार व सोनोग्राफी मशिनसह ताब्यात घेतले होते. दरम्यान, या प्रकरणाबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाने कमालीची गुप्तता पाळल्याचे चित्र आहे. कारण सदर प्रकार दीड-दोन महिन्यापूर्वीचा आहे. परंतु, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता महापालिकेच्या आरोग्य विभागाने संशयित डॉक्टरवर गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा (पीसीपीएनडीटी) अन्वये जिल्हा न्यायालयात खटला दाखला केला आहे.

इंदिरानगर येथील सिग्नलजवळ डॉ. बाळकृष्ण नारायण पाटील (रा. देवळी, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) असे संशयिताचे नाव असून, त्याच्याविरोधात गर्भलिंगनिदान प्रकरणी खटला दाखल करण्यात आला आहे. इंदिरानगर पोलिसांनी इनोव्हा कार व पोर्टेबल सोनोग्राफी मशिन ताब्यात घेतल्यानंतर सदर परिसर महापालिकेच्या हद्दीत येत असल्याने याबाबतची माहिती पोलिसांनी नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागाला देताच, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजयकुमार देवकर, सहा. आरोग्य अधिकारी डॉ. जितेंद्र धनेश्वर यांच्यासह पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दरम्यान, पोर्टेबल सोनोग्राफी मशिन आहे. ते छोटे असल्याने कुठेही घेऊन जाणे शक्य आहे. संशयित पाटीलची पीसीपीएनडीटी गर्भलिंगनिदानच्या सल्लागार समितीकडून चौकशी करण्यात
आली.
तत्पूर्वी त्या चौकशीसाठी पाटील यांनी हजर राहावे यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने त्यास नोटीस बजावली होती. दरम्यान, चौकशीत समाधानकारक उत्तर न मिळाल्याने डॉ. बाळकृष्ण पाटील यांच्याविरोधात आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर यांच्या निर्णयानुसार अ‍ॅड. सुवर्णा शेफाळे यांच्या माध्यमातून जिल्हा न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे.

रस्त्यात मशिन सापडल्याचा अजब दावा

पीसीपीएनडीटीच्या सल्लागार समितीसमोर डॉ. बाळकृष्ण पाटील यांची चौकशी झाली असता, त्यास पोर्टेबल मशिन कुठून आणले, असे विचारले असता सदर मशिन रस्त्यावर सापडल्याचे सांगत स्वत:च्या बचावाचा प्रयत्न केला. दरम्यान, जप्त केलेले पोर्टेबल सोनोग्राफी मशिन हे विदेशातच मिळते. तसेच, संशयित पाटीलविरोधात जळगाव जिल्ह्यातही गर्भलिंग निदानबाबतच्या तक्रारी असल्याचे मनपाच्या वैद्यकीय विभागाने म्हटले आहे.

आठ वर्षांपूर्वीच्या घटनेची पुनरावृत्ती

सातपूर परिसरात आठ वर्षांपूर्वी इनोव्हा कारमध्ये गर्भलिंगनिदानचे साहित्य आढळून आले होते. याप्रकरणी शाकुंतला डायग्नोेस्टिक सेंटरही सील करण्यात आले होते. दरम्यान, आठ वर्षांनंतर अशा घटनेची पुनरावृत्ती झाल्याचे समोर आले आहे.

इंदिरानगर येथे दीड-दोन महिन्यापूर्वी डॉ. बाळकृष्ण पाटील यांना इनोव्हा कारमध्ये पोलिसांनी पोर्टेबल सोनोग्राफी मशिन जप्त केले होते. त्यानंतर संबंधिताविरोधात गर्भलिंगनिदान कायद्यान्वये न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. गर्भलिंगनिदान कायद्याने गुन्हा असून, कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई केली जाईल.
-डॉ. विजयकुमार देवकर, वैद्यकीय अधीक्षक, मनपा

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

8 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

9 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

9 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

9 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

9 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

9 hours ago