नाशिक

गोकुळ गितेंनी घेतली आमदारकीची शपथ

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक विधान परिषद निवडणुकीत विजय मिळवणारे गोकुळ गिते यांनी मंगळवारी (दि.23) आमदारपदाची शपथ घेतली. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. शपथ घेण्यावेळी गिते यांच्या मातोश्री सुनीता गिते, पत्नी उज्ज्वला गिते, बंधू गणेश गिते यांच्या पत्नी नगरसेविका दीपाली गिते व समर्थक उपस्थित होते.
सोमवारी (दि. 22) लागलेल्या निवडणूक निकालात गिते यांनी महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव केला. गिते विजयी होताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे विश्वासू मंत्री उदय सामंत यांना विशेष विमानाने नाशिकला पाठवत मुंबईला बोलावून घेतले. यावेळी दोघांमध्ये काही मुद्यांवर चर्चा झाली. त्यानंतर गिते शिंदेसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून महायुतीत सहभागी झाले. राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असून, निकालाच्या दुसर्‍याच दिवशी गिते यांच्यासह नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतली.

महाजनांचा उल्लेख अन् सभागृह खळखळून हसले
गोकुळ गिते यांनी शपथ घेतल्यानंतर अखेरीस जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय असे म्हटले. मात्र, त्याचवेळी बाजूला असलेल्या मंत्र्यांमधून ’जय गिरीश महाजन’, असे वक्तव्य केल्याने सभागृहातील सर्वच खळखळून हसले. त्याचवेळी तेथे उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील यावर मजेशीर प्रतिक्रिया देत, ’तुमचं काही केलं असेल तर सांगून द्या’, असे म्हणताच उपस्थितांमध्ये पुन्हा हशा पिकला.

Gokul Gite took the oath as an MLA.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 days ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 days ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

2 days ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

2 days ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

2 days ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

2 days ago