नाशिक

सोने-चांदी महागले; जावईबापूंचा धोंडा अडचणीत!

नाशिक : प्रतिनिधी
अधिकमासात लेक-जावयासाठी धोंड्याचे अर्थात, सोन्या-चांदीचे वाण दिले जाते. यंदा ही परंपरा खंडित होण्याची शक्यता सोन्या-चांदीच्या वाढलेल्या दरामुळे वर्तवली जात आहे
अधिकमास 17 मे ते 15 जूनपर्यत आहे. यंदा सोने-चांदी दरात मोठी दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. यंदाचा अधिकमास लेक- जावयाला भेटीशिवाय साजरा करावा लागण्याची शक्यता आहे. अधिक मासातील सोने-चांदी खरेदी पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता आहे किंवा हलक्या वजनाचे दागिने घेण्याकडे कल असण्याची शक्यता सराफ व्यावसायिकांनी वर्तवली.
लेक-जावयाला लक्ष्मीनारायणाचे स्वरूप मानून त्यांचा मानपान अधिक मासानिमित्त केला जातो. अधिकमासात दानाचे महत्त्व असल्याने लोक दानधर्म करतात. 17 मे ते 15 जून या कालावधीत अधिक मास आहे. कोरोनात जावयांना धोंड्याला मुकावे लागले होते. त्यामुळे यंदा मात्र धोंड्याच्या महिन्यात लेक-जावयाची चांदी होणार का, याकडे लक्ष लागले आहे.
चांदीचे निरांजन, पूजेची भांडी, ताट-वाटी, चमचा, समई, जोडवी आदी वस्तूंना मागणी असते. अधिकमास आणि त्यानंतरच्या काळात चांदीचे दर दोन लाख 98 हजारांवर पोहोचले आहेत. अधिकमासात जावयांना, भाचांना, मुलीला चांदीचे दान आवर्जून दिले जाते. त्यासाठी सराफ बाजारात चांदीची जोडवी, दिवे, निरांजन, पूजेचे साहित्य याशिवाय सोन्यात जावयासाठी अंगठी, चेन, मुलींसाठी आभूषणे आदी उपलब्ध आहे. अधिकमासात ग्राहकांची गर्दी होण्याची शक्यता यंदा कमीच दिसतेे. दर अधिकमासात महिलांच्या पायातील जोडव्यांमध्ये वाढ केली जाते.आपल्या पसंतीनुसार एक ग्रॅमपासून अधिक चांदीची भर जोडव्यांमध्ये टाकली जाते. दरवाढीमुळे काहींनी सोन्याऐवजी चांदी किंवा चांदीऐवजी रोख रक्कम, कपडे व इतर भेटवस्तूंना प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. परंपरा टिकवताना वाढत्या महागाईत खर्चाचा ताळमेळ बसविताना आर्थिक गणित बिघडत आहे.
अधिकमासात सोन्यापेक्षा चांदीची मागणी अधिक असते. महिलांमध्ये अधिक मासानिमित्त जुन्या जोडव्यांमध्ये चांदीची भर टाकून नवीन बनविले जातात. त्यामुळे नवनवीन डिझाइनला यानिमित्ताने पसंती दिली जाते.

सोने-चांदी आणि दीपदानाचे महत्त्व
पुरुषोत्तम मासात जावई व मुलीला सोने-चांदीच्या स्वरूपात भेट दिली जाते. दीपदानाचे महत्त्व असल्याने तांबे किंवा चांदीचा दिवा भेट म्हणून दिला जातो. मंदिरांमध्ये तांब्याचे दिवे प्रज्वलित केले जातात. 33 या संख्येला विशेष महत्त्व असल्याने तांब्याचे 33 दिवे, अनारसे आदी दान स्वरूपात दिले जाते. सराफांकडे आकर्षक नक्षीचे तांब्याचे, चांदीचे दिवे उपलब्ध आहेत.

सोने दरवाढीमुळे सराफ व्यवसायावर परिणाम झाला आहे. आयातशुल्कात वाढ झाल्याने उच्चांकी दरवाढ झाल्याने ग्राहकांचे बजेट कोलमडले आहे. सोन्याचेे दर वाढले असले, तरी सणावाराला, लग्नसराईमुळे लाइटवेटसह गरजेचे दागिने, वस्तू घेतल्या जात होत्या. आता दर आवाक्याबाहेर गेल्याने अधिकमासात याचा
फटका बसण्याची शक्यता आहे.
– गिरीश नवसे
अध्यक्ष, सराफ असोसिएशन नाशिक

Gold and silver prices have increased; Son-in-law’s stone is in trouble!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

15 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

15 hours ago