मनपा बांधकाम विभागाचा असाही कारनामा
नाशिक : प्रतिनिधी
मनपा बांधकाम विभागांंतर्गत शहरात पावसाळी गटारीची कामे सुरू आहेत. मात्र, ही कामे निकृष्ट दर्जाची होत असून, अनेक ठिकाणी तुटलेले सिमेंटचे पाइप टाकले जात आहे. पाथर्डी गाव ते पाथर्डी फाटादरम्यान हे पाइप टाकले जात असल्याचे चित्र आहे. मात्र, याकडे बांधकाम विभागातील अधिकार्यांनी दुर्लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बांधकाम विभागातील अभियंत्यांच्या आशीर्वादामुळेच ठेकेदार असे फुटलेले पाइप टाकत असल्याचे बोलले जातेे.
पावसाळी गटार योजनेवर महापालिका कोट्यवधींचा खर्च करते. मात्र, दर्जाहीन पाइप टाकून ठेकेदार प्रशासनाची फसवणूक करत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, याप्रकरणी महापालिका प्रशासन लक्ष घालणार की नाही, असा सवाल केला जातो आहे. शहरात बांधकाम विभाग रस्तेकामे करण्याबरोबरच पावसाळी गटारीसाठी सिमेंटचे मोठे पाइप टाकण्याचे काम करत आहे. आगर टाकळी परिसरातही गोदावरी व नंदिनी नदी संगम पूल परिसरात अशाच पद्धतीने फुटलेले पाइप टाकले जात आहेत. मात्र, या कामाच्या गुणवत्तेवरच प्रश्न उपस्थित केला जात आहे. पावसाळी गटारीसाठी टाकल्या जाणार्या पाइपच्या कडा तुटलेल्या असतानाही ठेकेदार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. निकृष्ट काम झाल्यास भविष्यात पावसाचे पाणी तुंबून थेट रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. शहरात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्तेकामे सुरू आहेत. ही कामे पारदर्शक व गुणवत्तापूर्वक व्हावीत याकरिता सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांचे शहरातील सिंहस्थ कामाकडे लक्ष आहे. मात्र, असे असले, तरी शहरात पावसाळी गटारीचे काम निकृष्ट पाइप टाकून सुरू असून, त्याकडे प्रशासन लक्ष कधी देणार? असा सवाल केला जात आहे.
दर वाढविण्यासाठीची स्पर्धा
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्ताने शहरात रस्त्यांची कामे सुरू आहेत. मात्र, रस्तेकामाचे कोटेशन वाढविण्यासाठी शहरात अनेक ठिकाणी पावसाळी गटारसाठीचे सिमेंटचे पाइप टाकले जात आहेत. असे करताना कुठेही गुणवत्ता नसून दर्जाहीन पाइप व विटा वापरल्या जात आहेत. याकडे महापालिका प्रशासन लक्ष देणार का, असा सवाल केला जात आहे.
Rainwater drainage work by replacing broken pipes
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…