दुर्गामाता मित्रमंडळाने जपली परंपरा
लासलगाव : वार्ताहर
सोन्याचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडत असताना रस्त्यावर सोन्याची मौल्यवान वस्तू सापडल्यास अनेकांच्या मनात मोह निर्माण होऊ शकतो. मात्र, आजही समाजात प्रामाणिकपणा आणि माणुसकी जपणारी माणसे हयात आहेत, याचा प्रत्यय लासलगाव येथे आला. दुर्गामाता मंदिर, गणेशनगर परिसरात सापडलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम संबंधित महिलेची ओळख पटवून तिला परत करत दुर्गामाता मित्रमंडळाच्या पदाधिकार्यांनी प्रामाणिकपणाचा एक आदर्श घालून दिला आहे.
दुर्गामाता मंदिराजवळील रस्त्यावर मनीषा विजय कुराडे यांचे सोन्याच्या दागिन्यांचे व रोख रकमेचे पाकीट हरवले होते. या पाकिटात सुमारे पाच ग्रॅम वजनाचे अंदाजे 70 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि काही रोख रक्कम होती. ही वस्तू दुर्गामाता मित्रमंडळाचे पदाधिकारी सूरज पवार, किशोरी ढोबळे आणि वर्षा आव्हाड यांना सापडली. त्यांनी कोणताही लोभ किंवा मोह न बाळगता तत्काळ संबंधित महिलेचा शोध घेऊन तिच्या हरवलेल्या वस्तू सुरक्षितपणे तिच्या सुपूर्द केल्या. आपली मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम सुखरूप परत मिळाल्यामुळे मनीषा कुराडे यांना मोठा दिलासा मिळाला.
Gold jewelry and cash returned to the woman.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…