मित्रानेच रचला बनाव; आठ जणांविरुद्ध गुन्हा
दिंडोरी : प्रतिनिधी
पैशांचे प्रलोभन दाखवून शालेय मित्रानेच केलेल्या विश्वासाघातातून एका व्यावसायिकाला लुटल्याची खळबळजनक घटना वणी-फोफशी रस्त्यावर घडली. एक लाखाचे सहा लाख रुपये करून देण्याचे सांगून बोलावून घेतल्यानंतर चाकूचा धाक दाखवून मारहाण करत 3 लाख 87 हजार रुपयांचा मुद्देमाल लुटण्यात आला. याप्रकरणी वणी पोलिसांत आठ जणांच्या टोळीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कल्याण पूर्व (जि. ठाणे) येथील रहिवासी व पेस्ट कंट्रोल व्यावसायिक जेकब निकलस फर्नांडिस (39) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. फिर्यादी फर्नांडिस यांचा शालेय मित्र विजय आहेर याने त्यांना पैशांचे आमिष दाखवून वणी येथे बोलावले होते. 9 ऑक्टोबरला दुपारी तीन ते चारच्या दरम्यान, वणी ते फोफशी जाणार्या रस्त्यावरील एका निर्जनस्थळी संशयित विजय आहेर, संदीप शिंदे, प्रदीप गावित व त्यांच्या इतर पाच अनोळखी साथीदारांनी फर्नांडिस यांना गाठले. आरोपींनी त्यांना चाकूचा धाक दाखवून मारहाण केली आणि नंबरप्लेट नसलेल्या पांढर्या रंगाच्या तवेरा गाडीत बळजबरीने बसवले. गाडीतही त्यांना मारहाण सुरूच ठेवत त्यांच्याजवळील 2 लाख रुपये रोख, 1 लाख 50 हजार रुपयांचा आयफोन 15 प्रो मॅक्स, 35 हजार रुपयांचा वनप्लस मोबाइल, विविध बँकांचे आठ क्रेडिट कार्ड, चार डेबिट कार्ड आणि लॅपटॉप बॅग असा एकूण 3 लाख 87 हजार रुपयांचा मुद्देमाल बळकावून आरोपींनी पोबारा केला. या गंभीर घटनेप्रकरणी 11 ऑक्टोबर रोजी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार संशयितांचा शोध पोलीस यंत्रणेकडून घेतला जात आहे.
Young man swindled with the lure of a six-lakh-rupee benefit.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…