नाशिक

म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार ठिकाणी चेन स्नॅचिंगच्या घटना

पंचवटी : वार्ताहर
म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंकर पार्क, बालकृष्णनगर, कंसारा माता चौक आणि शांतीनगर, नाशिक – मखमलाबाद रोड येथे दोन दिवसांत चार चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या असून, याबाबत म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
पहिली घटना : वैशाली अशोक इंपाळ (42) एच.पी. गॅस गोडवूनजवळ, मेहेरधाम, पेठरोड ही महिला दि.25 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास त्यांच्या घराजवळील किराणा दुकानात सामान आणण्यासाठी गेली असता व दुकानातून सामान घेऊन परत घरी येत असताना शंकरपार्क बिल्डिंगच्या कॉर्नरला, बाळकृष्णनगर, मखमलाबाद, येथे पाठीमागून एका काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने फिर्यादीच्या गळ्यातील 20 हजार रुपये किमतीची एक 2.5 ग्रॅम वजनाची सोन्याची शॉर्ट पोत हिसकावून मोटारसायकलवर अश्वमेधनगरच्या दिशेने पळून गेले.
दुसरी घटना : श्रेयस रामानाथन अयर (22) रा. श्रीजी बंगलो, कंन्सारा माता चौक, म्हसरूळ दि. 25 रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास वाजेच्या म्हसरूळ मखमलाबाद लिंक रोडवरून कंन्सारा माता चौकाकडे पायी घरी जात असताना दिगंबर ट्रस्ट कपांउंड केलेल्या रोडलगत एका मोपेड मोटारसायकलवरून आलेल्या दोघा जणांनी 40 हजार रुपये किमतीची एक अंदाजे 12 ग्रॅम वजन असलेली गोफ केलेली सोन्याची चेन हिसकावून पळून गेले.
तिसरी घटना : (10 मिनिटांच्या अंतरावर दोनदा चेन स्नॅचिंग) : माधुरी ज्ञानेश बेलेकर (57)व्यवसाय-घरकाम, तांबे बोराडे मळा, लिलावती हॉस्पिटलजवळ, मखमलाबाद शिवार या दि. 26 सायंकाळी 7.40 वाजेच्या सुमारास त्यांच्या पतीसह स्वामी समर्थ केंद्र, शांतीनगर येथे दर्शन घेऊन पुन्हा घरी येत असता चंद्रकांत गॅस गोडावून रस्त्यावर पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या एकाने 70 हजार रुपये किमतीची 10 ग्रॅम वजनाची एक शॉर्ट पोत हिसकावून पळून नेली. तर तेथून पुन्हा सायंकाळी 7.50 वाजेच्या सुमारास शैलजा पंढरीनाथ पवार कंसरा चौक या घरातून कंसरा चौक येथे भाजीपाला घेण्यासाठी गेल्या असता भाजीपाला घेऊन घरी येत असताना साईकृपा हॉस्पिटलसमोर, त्यांच्या पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या एकाने त्यांच्या गळ्यातील 60 हजार रुपये किमतीची 9.6 ग्रॅम वजनाची सोन्याची शॉर्ट पोत हिसकावून मोटारसायकलवरून म्हसरूळ गावाच्या दिशेने पळून गेले. यात एकूण 1 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल गेला आहे. चेन स्नॅचिंगच्या घटनांचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंकुश चिंतामण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे करीत आहेत.

Gavkari Admin

Recent Posts

ठेकेदारीवरील महापालिका कर्मचार्‍यांच्या वेतनात भ्रष्टाचार

आ. देवयानी फरांदे यांची लक्षवेधी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेत ठेकेदारीवर नियुक्त करण्यात येणार्‍या कर्मचार्‍यांच्या…

15 hours ago

प्लास्टिकमुक्तीसाठी नागरिकांचीच उदासीनता

आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवीमुक्त दिन नाशिक ः प्रतिनिधी दोन वर्षांनी सिंहस्थ पर्वणी येत आहे. त्यानिमित्ताने नाशिक…

15 hours ago

आवक घटली, भाजीपाल्याचे दर कडाडले

नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे. सततच्या पावसामुळे भाजीपाला…

16 hours ago

सेंट्रल किचनमध्ये अस्वच्छता; गुणवत्तेचे तीनतेरा

दोन संस्थांना प्रशासनाधिकारी डॉ. चौधरींच्या नोटिसा नाशिक : प्रतिनिधी मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या पोषण…

16 hours ago

सहा हजार मिळकती मालमता कराच्या कक्षेत !

मनपाच्या तिजोरीत पडणार साडेबारा कोटींची भर, नोंद नसलेल्या मालमत्तांचा शहरात शोध नाशिक : प्रतिनिधी महापालिकेच्या…

16 hours ago

पावसाळ्यात घ्यायची काळजी

सामान्य माणसाने आयुर्वेदाच्या दृष्टीने पावसाळा म्हणजे थोडा आनंद, आणि भरपूर आजारपणाची भीती. पावसाळ्यात वातावरणात ओलावा…

17 hours ago