नाशिक

सुरगाण्याजवळ मालवाहतूक एसटी बस पुलाखाली कोसळली

सुरगाणा : प्रतिनिधी
तालुक्यातील बार्‍हे येथील शेंदरपाडा गावालगत असलेल्या पुलावर गुरुवारी मालवाहतूक करणारी एसटी बस रस्त्यावरून घसरून थेट पुलाखाली कोसळल्याची घटना घडली. या अपघातात बसचे मोठे नुकसान झाले असले, तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मालवाहतूक करत असताना पुलावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस रस्त्याच्या कडेला घसरून पुलाखाली गेली. अपघाताची माहिती मिळताच शेंदरपाडा परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. बसमध्ये प्रवासी नसल्याने दुर्घटना टळली, तसेच चालकही सुरक्षित आहे. अपघातानंतर काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. क्रेनच्या सहाय्याने बस बाहेर काढण्याचे काम सुरू केले आहे. या पुलावर वारंवार अपघाताच्या घटना घडत असल्याने, प्रशासनाने पुलावर मजबूत संरक्षण कठडे, इशारा फलक आणि परावर्तक चिन्हे यांसारख्या आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Goods-carrying ST bus plunges off bridge near Surgana.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

20 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

20 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

20 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

20 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

21 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

21 hours ago