नाशिक

दिव्यांगाच्या कारची तोडफोड

संशयितांना तत्काळ अटक करा

घोटी : प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील वाकी-बिटोरली येथील दिव्यांग नागरिक काशीनाथ आगिवले यांच्या स्विफ्ट कारची (एमएच 15- बीएन 6994) अज्ञातांनी तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली. 15 जुलैला रात्री 11 च्या सुमारास ही घटना घडली आहे. 24 तास उलटूनही संशयित फरार असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कार घराशेजारील मळ्यात उभी असताना अज्ञातांनी हल्ला करून तिचे मोठे नुकसान केले. याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, वाढत्या गुन्हेगारीमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. या घटनेवर प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष सोपान परदेशी यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. दिव्यांग व्यक्तीला लक्ष्य करून त्याच्या मालमत्तेचे नुकसान करणे अत्यंत गंभीर आहे. पोलिसांनी तपासाला गती देऊन आरोपींना तात्काळ जेरबंद करावे. तसेच दिव्यांग हक्क कायद्याच्या (दिव्यांग अ‍ॅक्ट) कलम 92 अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. संशयितांना त्वरित अटक न झाल्यास प्रहार दिव्यांग संघटना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही सोपान परदेशी यांनी प्रशासनाला दिला आहे.

Vandalism of a car belonging to a person with a disability

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

19 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

19 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

20 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

20 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

20 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

20 hours ago