नंदुरबार मध्ये गोवाल पाडवी यांची निर्णायक आघाडी
नाशिक: नंदुरबार मध्ये भाजपच्या उमेदवार हीना गावित या तब्बल 1 लाख 52 हजार मतांनी पिछाडीवर आहेत. येथे काँग्रेसचे गोवाल पाडवी यांना दीड लाख मतांची आघाडी मिळाली आहे, त्यामुळे येथे काँग्रेस खाते उघडण्याची शक्यता दिसून येत आहे. गोवाल पाडवी यांच्यासाठी प्रियांका गांधी यांनी सभा घेतली होती, नंदुरबार हा एकेकाळी काँग्रेस चा बालेकिल्ला होता, मधल्या काळात भाजपाने येथे बस्तान बसवल होते,