नाशिक: प्रतिनिधी
नाशिक लोकसभा मतदार संघात ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी दहाव्या फेरीपर्यंत कायम राहिली, दहाव्या फेरीअखेर वाजे यांनी तब्बल 1 लाखाहून अधिक मतांची आघाडी घेतल्याने त्यांच्या विजयाची केवळ औपचारिकता उरली आहे, शिंदे गटाचे विध्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा धक्कादायक पराभव होण्याची शक्यता निर्माण झाली असून वाजे गटाकडून जल्लोष सुरू झाला आहे.