शहरात शाश्वत विकासाची कामे होणार : महापौर
नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका दोनशे कोटींचे ग्रीन बॉण्ड येत्या बुधवारी (दि.25) बाजारात आणणार आहे. दरम्यान, या रकमेतून सिंहस्थ कामांचा शाश्वत विकास केला जाणार आहे. या ग्रीन बॉण्डच्या खरेदीसाठी नाशिकच्या उद्योजक, व्यावसायिकांसह नागरिकांनी त्यांच्या क्षमतेनुसार बॉण्डची खरेदी करून सिंहस्थासाठी हातभार लावावा, असे आवाहन महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी केले आहे.
नाशिक महापालिकेच्या ग्रीन बॉण्डचे (हरित रोखे) बुधवारी लिस्टिंग केले जाणार असून, त्यासंदर्भात स्मार्ट सिटी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले असता, महापौर आडके बोलत होत्या. यावेळी मनपा आयुक्त मनीषा खत्री, उपमहापौर विलास शिंदे, मुख्य लेखा वित्त आयोगाचे दत्तात्रय पाथरुट आदी उपस्थित होते. ग्रीन बॉण्ड खरेदीसाठी बुधवारी खुले होऊन 2 मार्च 2026 ला बंद होणार आहेत.
महापौर आडके म्हणाल्या, की काळानुसार गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय घ्यायला हवेत. त्यानुसार सिंहस्थपूर्व कामे आहेत. ती मार्गी लावायची असल्याने याकरिता सदर ग्रीन बॉण्ड रकमेचा उपयोग होणार आहे. शहर विकासात दिवसेंदिवस पुढे जात आहे. त्यामुळे सिंहस्थात होणारी विकासकामे शाश्वत केली जातील. पुढच्या वर्षीच्याच नव्हे, तर सन 2039 मध्ये होणार्या सिंहस्थ कामातही ग्रीन बॉण्ड रकमेचा उपयोग केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आयुक्त मनीषा खत्री यांनी ग्रीन बॉण्डची प्रक्रिया कशी असेल आणि त्यातून कोणती कामे केली जातील याबाबतची माहिती दिली. प्रेझेंटेशनद्वारे सिंहस्थात केल्या जाणार्या कामांची माहिती देण्यात आली. उपमहापौर विलास शिंदे यांनी, मनपाच्या वतीने खुले केले जाणार्या ग्रीन बॉण्डद्वारे सिंहस्थासाठी निधी उभारला जात असल्याचे सांगितले.
गुंतवणुकीचा कालावधी
3 वर्षे, 4 वर्षे, 5 वर्षे, 6 वर्षे, 7 वर्षे, 8 वर्षे, 9 वर्षे आणि 10 वर्षे यात सहामाही कूपन (व्याज) देयकाचे पर्याय उपलब्ध आहेत.ट्रेडिंग केवळ डीमॅट स्वरूपातच असून, 2 मार्च 2026 रोजी ते बंद होतील. प्रथम येणार्यास प्राधान्य या तत्त्वावर त्याचे वाटप केले जाईल. केअर अॅनालिटिक्स अँड अॅडव्हायझरी प्रा. लि.ने 14 जानेवारी 2026 रोजी ग्रीन बॉण्ड फ्रेमवर्कवर अहवाल प्रसिद्ध केला. हे बिगर-परिवर्तनीय कर्जरोखे नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज लि.वर सूचीबद्ध करणे प्रस्तावित आहे.
खालील कामांसाठी खर्च होणार
नाशिक महापालिका सिंहस्थ कुंभमेळा व पायाभूत सुविधांसाठी, विशेषतः मुकणे धरण थेट पाइपलाइन योजनेसाठी ’सेबी’कडून मंजुरी मिळालेले 200 कोटींंचे हरित रोखे बाजारात येणार आहेत. पिंपरी-चिंचवडच्या धर्तीवर ही योजना राबवली जात आहे. यातून पर्यावरणपूरक विकासासाठी निधी उभारला जाईल. नाशिक हरित रोखे बाजारातील मुख्य उद्देश सिंहस्थातील विकासकामे, सांडपाणी व्यवस्थापन आणि पाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे काम.
दहा हजारांची मर्यादा
ग्रीन बॉण्ड खरेदीकरिता दहा हजारांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यात सहामाहीसाठी 8.05 टक्के, तर वर्षभरासाठी 8.20 टक्के व्याज दिले जाणार आहे.
अवैध व्यवसायांसह खून, लहान-मोठ्या चोर्यांची मालिका सुरूच विंचूर : संदीप शिरसाठ विंचूर ऐतिहासिक परंपरा लाभलेले…
प्रा. जावेद शेख यांचा संशोधनातून महत्त्वपूर्ण शोध सिन्नर : वार्ताहर ऐतिहासिक व स्थापत्यवैभवासाठी ओळखल्या जाणार्या…
अपघाती मृत्यूनंतर चांदवडमध्ये जनक्षोभ चांदवड : वार्ताहर येथील गणूर रोडवरील फुलेनगर भागात मंगळवारी (दि. 24)…
मनमाड : अमिन शेख मनमाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्याकडून सध्या शहरात राबविली जाणारी स्वच्छता…
व्यवस्था कोलमडणार; महासभेवर लवकरच प्रस्ताव? नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेला आपल्याच कचर्याचे वर्गीकरण करण्यात अपयश…
पालखी सोहळ्याने सायखेडा भक्तिमय नाशिक : प्रतिनिधी सायखेडा येथे बालाजी भगवान संस्था यांच्या प्राचीन परंपरेनुसार…