नाशिक

निमाणी बसस्थानक समस्यांचे आगार

प्रवाशांच्या आर्थिक फसवणुकीसह मनस्तापात भर

नाशिक ः प्रतिनिधी
शहरातील निमाणी बसस्थानक समस्यांचे आगार बनले असून, प्रवाशांना शहरात आल्यानंतर इच्छित स्थळी जाण्यासाठी रिक्षाचालकांकडून आर्थिक भुर्दंडासह मनस्तापाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे.
आगामी सिंहस्थाच्या कामांमुळे शहरातील मुख्य रस्त्यांचे ड्रेनेज, गॅस पाइपलाइन आदींची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. बाहेरगावच्या बसेस निमाणी येथून सुटत असल्याने प्रवाशांचा गोंधळ होण्याबरोबरच आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. रिक्षाचालक मनमानी भाडे आकारून प्रवाशांना इच्छित स्थळापासून दूर सोडणे किंवा इच्छित स्थळावर जाण्यासाठी चुकीची माहिती देणे, जास्त भाडे आकारणे, अरेरावीची भाषा करून प्रवाशांत भीती, संभ्रमाचे वातावरण निर्माण करीत
आहेत.
सिंहस्थाच्या कामांमुळे सीबीएस परिसरातील मुख्य बसस्थानक तात्पुरत्या कालावधीसाठी निमाणी येथे हलविण्यात आले आहे. शहर व उपनगरातील सिटीलिंकच्या बसेस तपोवनातून सुटत असल्याने प्रवाशांना याबाबत माहिती नसल्याने मिळेल त्या वाहनाचा आधार घेत प्रवास करावा लागतो. त्यामुळे प्रवाशांची अडवणूक होईल असे वर्तन रिक्षाचालकांकडून केले जातेे. रिक्षाचालकांच्या तक्रारींत वाढ झाली आहे. परिणामी प्रवाशांना आर्थिक भुर्दंडासह मनस्तापालाही सामोरे जावे लागते.
निमाणी बसस्थानकात दोन डेपोच्या गाड्या एकाच ठिकाणी येत असल्याने प्रवाशांचा गोंधळ उडतोे. गावांचे फलक लावूनही प्रवाशांचा गोंधळ कायम आहे. स्थानकाबाहेर आल्यानंतरही रिक्षाचालकांकडून फसवणुकीचे प्रकार होताना दिसतात. निमाणी बसस्थानकावर अस्वच्छता, कचर्‍यामुळे दुर्गंधीचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतोे.
निमाणी येथून येवला, लासलगाव, मनमाड, नांदगाव, पेठ, कळवण, सुरगाणा, सप्तशृंगगड, नवापूर, नंदुरबार आदी मार्गांवरील बसेस सुटतात. त्यामुळे प्रवाशांची मोठी गर्दी होतेे. तात्पुरत्या बसस्थानकावर तिकीट बुकिंगसाठी उन्हात ताटकळत उभे राहावे लागते. येथील कचराकुंडी, स्वच्छतागृहातील अस्वच्छता यामुळे आसपासच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्याचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. गर्दीचा फायदा घेत रिक्षाचालक प्रवाशांची अडवणूक करीत असल्याचे चित्र आहे.

पुणे, कोल्हापूरसह इतर ठिकाणी जाणार्‍या बसेस नाशिक शहरात येताना पूर्वी ठक्कर बझार व मेळा बसस्थानकात येत होत्या. त्यामुळे प्रवाशांना आपल्या घरी किंवा नातेवाइकांकडेे जाताना सिटीलिंक बस किंवा रिक्षाने जाणे सोपे होत होते. आता शहरात येणार्‍या बसेस निमाणी बसस्थानकावर थांबतात. त्यामुळे प्रवाशांना आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी निमाणी येथून रिक्षा किंवा सिटीलिंकच्या बसेसद्वारे पुढील प्रवास करावा लागतो.

Nimani bus stand is a hotbed of problems

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

8 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

8 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

8 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

8 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

8 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

8 hours ago