महाराष्ट्र

वधू-वरांच्या रील्सचा वाढता ट्रेंड; रोजगाराचे नवे दालन

विवाहपूर्वीच्या केळवणचे जेवण, मेहंदी, हळद रील्स सोशल मीडियावर

निफाड : विशेष प्रतिनिधी
डिजिटल आणि इंटरनेटच्या युगात स्मार्टफोन व सोशल मीडियाचा वाढता वापर लक्षात घेता ‘रील्स’ तयार करण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. काही सेकंदांच्या आकर्षक व्हिडिओमधून स्वतःची ओळख, व्यवसाय, कार्यक्रम किंवा जीवनशैली प्रभावीपणे सादर करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे.
हा ट्रेंड आता शहरांपुरता मर्यादित न राहता ग्रामीण भागातही झपाट्याने पोहोचला आहे. विशेष म्हणजे, रील्स बनविणे हा केवळ छंद न राहता अनेक तरुणांसाठी रोजगाराचे प्रभावी साधन
ठरत आहे.
पूर्वी केवळ छायाचित्रे आणि साधे व्हिडिओ इतक्यापुरते मर्यादित असलेले कार्यक्रम आता सिनेमॅटिक रील्स, ड्रोन शूट, स्लो मोशन व्हिडिओ, ट्रेंडिंग गाण्यांवरील एडिटिंग आणि आकर्षक ट्रान्झिशनपर्यंत पोहोचले आहेत. काही सेकंदांचा आकर्षक व्हिडिओ हजारो लोकांपर्यंत पोहोचत असल्याने व्यवसायवाढीस मदत होत असल्याचे व्यावसायिकांचे मत आहे. तालुक्यातील अनेक तरुण आता व्हिडिओ शूटिंग, एडिटिंग, ड्रोन कॅमेरा ऑपरेशन, सोशल मीडिया हँडलिंग आणि डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय उभा करत आहेत. कमी खर्चात मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळत असल्याने रील्स हे प्रभावी मार्केटिंग माध्यम म्हणून पुढे
येत आहे.
गावोगावी लहान स्टुडिओ, फ्री लान्स व्हिडिओग्राफर आणि सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर यांची संख्या वाढताना दिसत आहे.
निफाड तालुक्यातील अनेक राजकीय नेते आता सभा, दौरे, विकासकामे, नागरिकांशी संवाद तसेच वाढदिवसीय कार्यक्रमांचे आकर्षक रील्स तयार करून
फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर प्रसारित करत आहेत.
ट्रेंडिंग गाण्यांच्या पार्श्वभूमीवर तयार होणारे स्लो मोशन व्हिडिओ, ड्रोनमधून टिपलेली दृश्ये आणि घोषणाबाजी असलेले व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. डिजिटल युगात सोशल मीडिया हे प्रभावी संवादमाध्यम बनले असून, रील्सच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुणांनाही नवीन संधी उपलब्ध होत आहेत. बदलत्या तंत्रज्ञानासोबत रोजगाराच्या नव्या वाटा निर्माण होत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.

लग्नसमारंभांमध्ये रील्सची क्रेझ वाढली आहे. प्री-वेडिंग शूटपासून केळवण, मेहंदी, हळद, साखरपुडा आणि रिसेप्शनपर्यंत प्रत्येक कार्यक्रमाचे सिनेमॅटिक रील्स तयार केले जात आहेत. वधू-वर आकर्षक लोकेशनवर ट्रेंडिंग गाण्यांवर शूट करताना दिसत आहेत. काही कुटुंबांनी तर लग्नातील खास क्षण टिपण्यासाठी स्वतंत्र रील्स शूटसाठी वेगळे बजेट ठेवण्यास सुरुवात केली आहे.
– सिद्धांत पाटील, रील्स मेकर, नैताळे

Growing trend of bride and groom reels; new avenue for employment

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

18 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

18 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

18 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

18 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

18 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

18 hours ago