नाशिक

सिन्नर-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; 5 जण जखमी

स्थानिक नागरिकांनी केली मदत

सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर ते नाशिक मार्गावर विठुमाउली पुलाजवळ रविवारी (दि. 17) पहाटे इलेक्ट्रिक कार दुभाजकावर आदळून झालेल्या भीषण अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. हे पाचही जण पाथर्डी फाटा, नाशिक परिसरातील रहिवासी असल्याचे समजते.
जखमींवर सिन्नर येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य सांगळे आपल्या सहकार्‍यांसह इलेक्ट्रिक कार(एमएच 15- केयू 6253)ने सिन्नरहून नाशिककडे जात असताना सिन्नर बाह्य वळण रस्त्यावरील विठुमाउली हॉटेलसमोरील पुलावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार थेट दुभाजकावर जाऊन धडकली.
अपघात इतका जोरदार होता की, कारमधील पाचही जण गंभीर जखमी झाले.
या अपघातात राहुल कैलास ओझा (वय 26, रा. पाथर्डी फाटा, नाशिक) यांना उजव्या खांद्याला व दोन्ही पायांना दुखापत झाली. अनिरुद्ध धीरज दायमा (23, रा. चेतनानगर, नाशिक) यांना उजव्या पायाला व हाताला मार लागला. दीपक मुंडे (32, दत्तमंदिर, नाशिकरोड) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जातेे. आदित्य सांगळे (34, विधातेनगर, नाशिक) यांना छाती व कमरेला दुखापत झाली आहे. भरत बटाव (26, रा. पाथर्डी फाटा, नाशिक) यांनाही डोक्याला व हाताला मार लागला आहे.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत जखमींना सिन्नर येथील यशवंत हॉस्पिटलमध्ये दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले. याप्रकरणी मुसळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.

Fatal accident on Sinnar-Nashik highway; 5 injured

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

17 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

17 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

17 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

17 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

17 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

17 hours ago