दिव्यांग बालनाट्य स्पर्धेत ‘गुरुदक्षिणा’ बालनाट्य प्रथम
नाशिक : प्रतिनिधी
सातव्या महाराष्ट्र राज्य दिव्यांग बालनाट्य स्पर्धेत नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, सातपूर संस्थेच्या गुरुदक्षिणा या बालनाट्याला प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहे. तसेच महाराष्ट्र समाजसेवा संघ, नाशिक यांच्या ‘चक्र’ या नाटकाला द्वितीय, तर प्रबोधिनी ट्रस्ट, नाशिक यांच्या ‘मोल अनमोल’ या नाटकाला तृतीय पारितोषिक घोषित मिळाले.
दिग्दर्शन विभागात प्रथम पारितोषिक वर्षा साबळे (गुरुदक्षिणा), द्वितीय धनंजय वाबळे (चक्र), तृतीय कांचन इप्पर (मोल अनमोल) यांनी मिळविले. प्रकाश योजना विभागात कृतार्थ कंसारा (चक्र) प्रथम, ललित श्रीवास्तव (गुरुदक्षिणा) द्वितीय, तर विनोद राठोड (तमसो मा ज्योतिर्गमय) तृतीय ठरले.
नेपथ्य विभागात सरोज आहेर (मोल अनमोल) प्रथम, लता नायक द्वितीय, तर समृद्ध आशाये तृतीय ठरले. रंगभूषा विभागात वैशाली लहरे (गुरुदक्षिणा) प्रथम, सुदर्शन पाटील (मोल अनमोल) द्वितीय, तर मिमांशी बागल (चक्र) तृतीय ठरले. वेशभूषा विभागात प्रियांका पालवे (गुरुदक्षिणा) प्रथम, निशा गायकवाड द्वितीय, तर राजश्री कुलकर्णी तृतीय ठरल्या.
उत्कृष्ट अभिनयासाठी हर्ष परियार (तमसो मा ज्योतिर्गमय) आणि सानिया खान (चिमणी उड कावळा उड माणूस उड?) यांना विशेष पारितोषिक देण्यात आले.
दि. 4 ते 6 फेब्रुवारीदरम्यान परशुराम सायखेडकर नाट्यगृहात स्पर्धा पार पडली. एकूण 12 बालनाट्य प्रयोग सादर करण्यात आले. परीक्षक म्हणून प्रवीण अहिरे, आकाश बाविस्कर आणि गौरी लोंढे यांनी काम पाहिले.
सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले.
संगीत दिग्दर्शन विभागात रोहित स्रोडे (चक्र) प्रथम, ओम देशमुख (गुरुदक्षिणा) द्वितीय, तर आशिष गाडे तृतीय ठरले. नाट्यलेखन विभागात सुगंधा शुक्ल (गुरुदक्षिणा), स्वप्नील देशमुख (आम्ही काही कमी नाही) आणि फुलवती आशाये (विठ्ठलास आमंत्रण) यांचा गौरव करण्यात आला.
‘Gurudakshina’ children’s play wins first place in disabled children’s play competition
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…