गुरुवारी या प्रभागात पाणीबाणी

नाशिक : प्रतिनिधी

पंचवटी विभागाअंतर्गत पेठ रोड गंगापूर डावा तट कालव्याजवळ, दुर्गानगर आणि मखमलाबाद जलकुंभास पाणीपुरवठा करणा-या उर्ध्ववाहिनीला गळती लागली आहे. हे काम तातडीने करणे आवश्यक असल्याने उर्ध्ववाहीनी दुरुस्तीचे काम गुरुवार (दि. 12) हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे दुर्गानगर व मखमलाबाद जलकुंभावरुन प्रभाग क्र. 1 आणि प्रभाग क्रमांक 6 मध्ये होणा-या पाणीपुरवठ्यावर परीणाम होणार आहे.

प्रभाग क्र. 1 मधील शिवतेज नगर (पै.), श्रीधर कॉलनी (पै) तसेच प्रभाग क्रमांक 6 मधील चांदशी रोड, गंगावाडी रोड, फडोळ मळा, रामकृष्ण नगर, पिंगळे नगर, एरिकेशन कॉलनी, मानकर नगर, महालक्ष्मी नगर, स्वामी विवेकानंद नगर, मानकर मळा, तवली डोंगर परिसर, कल्याणी व राजेय सोसायटी, मेहेरधाम, गॅस गोडावून, यशोदानगर, पेठरोड या परिसरात 12/01/2023 रोजीचा दुपारचा आणि सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. तर
शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा बंद असणार आहे.
प्रभाग क्र. 1 मधील दुर्गा नगर, शिव समर्थ नगर, जुई नगर, ओंकार बंगला परिसर शिवतेज नगर (पै.), श्रीधर कॉलनी (पै.) प्रभाग क्रमांक 4 मधील कॅन्सर हॉस्पीटल मागील परिसर, अनुसयानगर, कर्णनगर, समर्थनगर तुळजाभवानी नगर, हमालवाडी परिसर, पवार मळा परिसर तसेच प्रभाग क्रमांक 6 मधील मखमलाबाद गांव, मखमलाबाद रोड पश्चिम भाग, मातोश्री नगर, विद्या नगर, वडजाई माता नगर, महादेव कॉलनी, कोळी वाडा, घाडगे नगर, एरिकेशन कॉलनी (पै.), मानकर नगर (पै.), जयमल्हार कॉलनी, अश्वमेघ नगर, सप्तरंग सोसायटी या परिसरात शुक्रवार (दि. 13) सकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. याबाबत परिसरातील नागरिकांनी नोंद घेऊन महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे
कार्यकारी अभियंता प्रकाश निकम यांनी केले आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

विजेचा शॉक लागून 4 जनावरे दगावली

विजेचा शॉक लागून 4 जनावरे दगावली   काजी सांगवी ( वार्ताहर) आज सायंकाळी 7 वाजून…

6 hours ago

मोठी बातमी: सिन्नर बस स्थानकाचे छताचे शेड कोसळले

नाशिक: प्रतिनिधी सिन्नर येथे झालेल्या तुफान पाऊस आणि वादळ वाऱ्यामुळे येथील हायटेक बस स्थानकाचे प्लॉट…

10 hours ago

बांगड्या पळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तोतया पोलिसाला जमावाने बदडले

सटाणा:  प्रतिनिधी शहरात महिलेवर चाकु हल्ला झाला आहे. आम्ही पोलिस असून तुम्ही कुठे चाललात हातातल्या…

1 day ago

लढाऊ वैमानिकांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज

कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलची पासिंगआउट परेड दिमाखात नाशिक ः प्रतिनिधी जहाँ डाल डाल पे…

1 day ago

मॉन्सून दोन दिवसांत केरळात दाखल

राज्यात सात दिवसांत दाखल नवी दिल्ली ः महाराष्ट्रात मॉन्सूनपूर्व पावसाने थैमान घातले असताना अरबी समुद्रात…

1 day ago

56 तासांनंतर जिंदाल आग आग आटोक्यात

इगतपुरी : प्रतिनिधी तालुक्यातील मुंढेगाव परिसरातील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीला तीन दिवसांपूर्वी लागलेली आग अखेर 56…

2 days ago