मजूर फेडरेशनच्या चेअरमनपदी भाबड, व्हा.चेअरमनपदी कुशारे

मजूर फेडरेशनच्या चेअरमनपदी
भाबड, व्हा.चेअरमनपदी कुशारे
नाशिक : जिल्हा मजूर फेडरेशनच्या अध्यक्षपदी नांदगाव येथील प्रमोद भाबड तर व्हा.चेअरमनपदी शर्मिला कुशारे यांची निवड झाली. दोन्ही उमेदवार राजेंद्र भोसले गटाचे आहेत. भोसले यांच्याकडे वीस पैकी 12 संचालक होते. त्यामुळे चेअरमन, व्हा.चेअरमन भोसले गटाचेच होणार हे निश्‍चित होते. चेअरमनपदासाठी भोसले गटाकडून प्रमोद भाबड तर संपतराव सकाळे गटाकडून ज्ञानेश्‍वर लहाने. व्हा.चेअरमनपदासाठी भोसले गटाकडून शर्मिला कुशारे तर सकाळे गटाकडून सुरेश भोये यांनी अर्ज केले होते. मात्र, भोसले गटाच्या उमेदवारांना 12 तर सकाळे गटाच्या उमेदवारांना 8 मते मिळाल्याने भाबड आणि कुशारे विजयी घोषित करण्यात आले. या निवडीनंतर जल्लोष करण्यात आला.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

13 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

13 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

13 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

13 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

13 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

13 hours ago