.न्यायडोंगरी,
न्यायडोंगरी येथे जंगली तरसाच्या हल्ल्यात २ मुले जखमी झाल्याची घटना घडली. परिसरात प्रथमच घडलेल्या तरसाच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, इंदिरानगर (गवळीवाडा ) न्यायडोंगरी येथील धना नाना दळवी यांचा वनविभाग क्षेत्रात असलेल्या मन्याड नदी पात्रालगत कार्यक्रम होता. सदर कार्यक्रमास उशिर असल्याने थोड्या दूर अंतरावर नदीपात्रालगत मुले खेळण्यासाठी गेली व त्या ठिकाणी असलेल्या कपारीत दबा धरून बसलेल्या तरसाने कार्यक्रमास आलेले महेश ठाकरे (११) व कृष्णा ठाकरे (१३) या २ मुलांवर कपारीतून बाहेर पळून जात असताना मुलांच्या डोक्याला पायाच्या पंजाने जखमी करीत पळ काढला.अचानक झालेल्या हल्ल्याने मुलांनी आरडाओरडा केला व त्याचक्षणी तरसाने जंगलाकडे धूम ठोकली. जखमी झालेल्या मुलांना तातडीने डॉ.राठोड त्यांच्या खाजगी दवाखान्यात दाखल करून उपचार करून घेतले.
तरसाने केलेल्या हल्ल्यामुळे परिसरातील वाडीवस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे. वन विभागाने या परिसरातील तरसाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
पत्नीला स्वर्गलोकी पाठवत मी पण जात आहे... नाशिकरोडला निवृत्त मुख्याध्यापकाने उचलले टोकाचे पाऊल नाशिकरोड :…
एचपीटीतील लिट-फेस्टमध्ये इंग्लिश-फ्रेंच संस्कृतीचे दर्शन नाशिक :- एचपीटी आर्ट्स अॅण्ड आरवायके सायन्स महाविद्यालयातील इंग्रजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी…
गौतमी पाटीलने आपल्या ठसकेबाज लावणीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. सबसे कातील अशी ही नृत्यांगना…
भारतीय संविधानाची सखोल माहिती देणारा अनिल कुमार जवादे आणि ओंकार निर्मित सचिन उराडे लिखित आणि…
दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील सह्याद्री फार्म येथे वास्तव्यास असलेल्या परप्रांतीयांच्या रुममधे सिलेंडरमधील…