गांवकरी व राधिका फाउंडेशनतर्फे पर्यावरणदिनी वृक्षलागवड उपक्रम

नाशिक : प्रतिनिधी
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत येत्या 5 जून रोजी दैनिक गांवकरी व राधिका फाउंडेशन आणि आपलं पर्यावरण संस्थेच्या वतीने एक हजार बांबूच्या वृक्षांची लागवड नाशिक देवराई येथे करण्यात येणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होणार्‍या पर्यावरणप्रेमींना दैनिक गांवकरी व राधिका फाउंडेशनच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमातच सेवानिवृत्त विभागीय वनाधिकारी समन्वयक भास्कर पवार आणि बांबूतज्ज्ञ अजित टक्के यांचे सकाळी 10 ते 11 या वेळेत मार्गदर्शन शिबिर होणार आहे. यामध्ये योग्य ठिकाणी योग्य प्रजातीच्या बांबूची लागवड व त्यापासून होणारे जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन व उपजीविका याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त पर्यावरणप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन राधिका फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना सेवक यांनी केले आहे. वन विभाग पश्‍चिम व आपलं पर्यावरण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने देवराई दर्शन कार्यक्रम सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत राहणार आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

17 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

17 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

17 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

17 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

17 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

17 hours ago