नाशिक शहर

बजरंगवाडीत पुन्हा तुफान हाणामारी

कोयता, धारदार शस्त्रचा वापर
नाशिक प्रतिनिधी
हळदी समारंभात नाचन्यावरून कोयत्याने वार केल्याच्या घटनेला 24 तासही उलटत नाही तोच पुन्हा बजरंग वाडीत कोयता तसेच धारदार शस्र हातात घेऊन तुफान हाणामारी झाली, यात एक जण जखमी झाला आहे. गेल्या काही दिवसापासून हाणामारी च्या घटना वाढत असून, पोलिसांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. पिंटू दिवे यास मारण्यासाठी चेतन जाधव, राहुल ब्राह्मणे हे आले असता जीव वाचवण्यासाठी पिंटू दिवे हा एक जणांच्या घरात लपला. याचा राग आल्याने शीतल पुजारी यांच्या आईस दोघांनी मारहाण केली, हे भांडण सोडवण्यास शीतल पुजारी यांचा भाऊ आला असता दमयंती जाधव, संगीता जाधव, शेखर काळे, अभिषेक जाधव, प्रकाश शिंगाडे ,अभिषेक ब्राह्मणे हे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी शीतल पुजारी आणि त्यांच्या नातेवाईक याना बेदम मारहाण केली, याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

अवघ्या दीड महिन्यातच हेमलता पाटील यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

नाशिक: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तिकीट न दिल्यामुळे नाराज झालेल्या कॉंग्रेस प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील…

5 hours ago

मनमाडला कांदे ट्रॅक्टरमध्ये भरताना शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

मनमाडला रेल्वे कर्मचाऱ्याचा कांदे भरत असतांना शॉक लागून मृत्यू मनमाड : प्रतिनिधी मनमाडनजीक असलेल्या नागापूर…

8 hours ago

शेतकरी ओळखपत्र आजपासून अनिवार्य

8 लाख 75 हजार 912 शेतकर्‍यांची फार्मर आयडीकडे पाठ सिन्नर : भरत घोटेकर कृषी विभागाच्या…

8 hours ago

घोटेवाडीत सहा ट्रॉली कडब्यासह 55 टन मुरघास आगीत भस्मसात

दोन लाखांचे नुकसान; ऐन उन्हाळ्यात जनावरांच्या तोंडचा घास हिरावला सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील घोटेवाडी येथील…

8 hours ago

नर्गिंस दत्त विद्यालयातील 20 मुलींना नवीन सायकल भेट

नाशिक : प्रतिनिधी भारतीय वंशाच्या अमेरिकेत वास्तव्य असलेल्या दातृत्वाने नर्गिंस दत्त विद्यालयातील 20 मुलींना नवीन…

9 hours ago

डॉ. आंबेडकरांच्या जीवनावर आधारित विविध घटनांचे उपनगरला प्रदर्शन

उपनगर वार्ताहर: उपनगर-गांधीनगर संयुक्त जयंती समितीतर्फे यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आगळ्यावेगळ्या प्रबोधनात्मक पद्धतीने साजरी…

9 hours ago