देवळाली कॅम्प : प्रतिनिधी
नाशिक आर्मी अॅडव्हेंचर विंगच्या एका जवानाकडून साहसी क्रीडाप्रकारांतर्गत येणार्या हँग ग्लायडरद्वारे गुरुवारी (दि.28) सकाळी नियमितपणे सराव केला जात असताना, तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने जवानाचे ग्लायडरवरील नियंत्रण सुटले अन् ते ग्लायडर थेट देवळाली कॅम्पजवळील शिंगवे बहुला गावातील लोकवस्तीमधील एका रहिवाशाच्या घरावर कोसळले.
या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी ग्लायडिंग करणारे हवालदार गुरुदेव सिंग हे गंभीररीत्या जखमी झाले असून, त्यांच्यावर देवळाली कॅम्पच्या सैनिकी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भागात लष्करी जवानांकडून वेगवेगळ्या प्रकारचा सैनिकी प्रशिक्षणांतर्गत सराव केला जात असतो. खंडोबा टेकडी डोंगराच्या पुढे देवळाली फिल्ड फायरिंग रेंजकडे जाणार्या रस्त्यावर शिंगवे बहुला हे टोकाला वसलेले शेवटचे गाव आहे. सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास या भागात लष्कराच्या एका जवानाकडून साहसी क्रीडाप्रकारांतर्गत मोटार हँग ग्लायडरद्वारे सराव केला जात होता. यावेळी अचानकपणे त्यामध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला आणि जवानाचे ग्लायडरवरील नियंत्रण सुटले. गावातील कौसाबाई चव्हाण या रहिवासी महिलेच्या घरावर हे ग्लायडर कोसळले. दुर्घटनेची माहिती वॉकीटॉकीद्वारे जवानाकडून मिळताच सैनिकांचे ‘विंड रायडर्स’चे पथक घटनास्थळी दाखल झाले. तातडीने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने घराच्या पत्र्यावर चढून काही जवानांनी ग्लायडरमध्ये अडकलेल्या जवानाला ‘रेस्क्यू’ केले आणि तातडीने लष्कराच्या वाहनातून रुग्णालयात हलविले असून, पुढील उपचारासाठी भारतीय नौदलाच्या मुंबईस्थित आयएनएचएस अश्विनी रुग्णालयात हलविण्यात येणार आहे.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…