महाराष्ट्र

मेहनती व्यक्तिमत्त्व गेले : पंतप्रधान मोदी

मेहनती व्यक्तिमत्त्व गेले : पंतप्रधान मोदी
अजित पवारजी हे जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते. महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत सदैव अग्रभागी राहणारे एक मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना व्यापक आदर होता. प्रशासकीय बाबींची त्यांना सखोल जाण होती. गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठीची त्यांची तळमळ विशेष उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रति आणि असंख्य चाहत्यांप्रति मनःपूर्वक शोकसंवेदना. महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातामुळे मी अत्यंत दुःखी आहे. या अपघातात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या सर्वांच्या दुःखात मी सहभागी आहे. या दुःखाच्या क्षणी शोकाकुल कुटुंबांना शक्ती आणि धैर्य मिळो, ही प्रार्थना करतो.

माझा दिलदार मित्र गमावला : मुख्यमंत्री फडणवीस
महाराष्ट्राकरिता आजचा दिवस अतिशय कठीण असा दिवस आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी ते अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान देत होते. सकाळपासून सर्वांच्या संपर्कात आहे. सुप्रिया सुळे व पार्थ पवारसोबत माझे बोलणे झाले. अशा गोष्टीवर मन विश्वासच ठेवत नाही. हा पवार कुटुंबावर मोठा आघात आहे. या दु:खाच्या वेळी आम्ही त्यांच्यासोबत असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली. जमिनीशी घट्ट नाळ असलेले जनतेचे, माझे मित्र व सहकारी होते. उपमुख्यमंत्री पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना मनाला अत्यंत व्यथित करणारी आहे. मनाला चटका लावणारी आहे. मन सुन्न झाले आहे. भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. माझा दमदार व दिलदार मित्र मी गमावला आहे. माझ्यासाठी ही वैयक्तिक हानी आहे.

मोठा भाऊ हरपला : उपमुख्यमंत्री शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, माझ्या मनात माझा मोठा भाऊ हरपला, अशी भावना आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मनाला चटका आणि वेदना देणारी ही घटना आहे. अजितदादा आपल्याला इतक्या लवकर सोडून जातील असा विचारही कोणी केला नसेल. दादा गेली अनेक वर्षे महाराष्ट्राचे नेतृत्व करत होते. अतिशय परखड व्यक्तिमत्त्व होतं त्यांचं. चुकीला चूक म्हणणारे ते असले तरी ते मनाने अतिशय निर्मळ होते, याचा अनुभव मी घेतला आहे. मी त्यांच्यासोबत अनेक वर्षे काम केले आहे. सकाळी 6 वाजतादेखील ते लोकांना भेटायचे. परवाच आमची एका कार्यक्रमात भेट झाली होती. वयाने आणि अनुभवाने ते माझ्यापेक्षा मोठे होते. त्यामुळेच मला माझा मोठा भाऊ हरपला, असे वाटत आहे.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

4 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

4 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

5 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

5 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

5 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

5 hours ago