नाशिक

शेअर चॅटवरील मैत्री पडली महागात

नाशिक : प्रतिनिधी
शेअरचॅटद्वारे मैत्री केलेल्या महिलेवर लग्न मोडण्याची धमकी देऊन अत्याचार करण्यात आला आहे. मुंबईच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी महिला ही नाशिक येथे राहते. या महिलेशी मुंबईच्या व्यक्तीने शेअरचॅटद्वारे मैत्री केली. यानंतर तिचा विश्‍वास संपादन करून पीडित महिलेला शिर्डी येथे दर्शनासाठी नेले. तेथे जाऊन पीडित महिलेशी परिचय वाढविला. त्यानंतर पीडित महिलेसोबत काढलेले सेल्फी फोटो महिलेच्या पतीला पाठवून महिलेला लग्न मोडण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडित महिलेस वणी, त्र्यंबकेश्‍वर येथील लॉजवर नेऊन वेळोवेळी जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. या संबंधास महिलेने प्रतिकार केला असता तिला मारहाण व दमदाटी केली. हा प्रकार दि. 18 ते 28 डिसेंबर 2021 दरम्यान घडला. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार भद्रकाली पोलीस ठाण्यात मुंबईच्या व्यक्तीविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

13 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

13 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

14 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

14 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

14 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

14 hours ago