नाशिक : प्रतिनिधी
शेअरचॅटद्वारे मैत्री केलेल्या महिलेवर लग्न मोडण्याची धमकी देऊन अत्याचार करण्यात आला आहे. मुंबईच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी महिला ही नाशिक येथे राहते. या महिलेशी मुंबईच्या व्यक्तीने शेअरचॅटद्वारे मैत्री केली. यानंतर तिचा विश्वास संपादन करून पीडित महिलेला शिर्डी येथे दर्शनासाठी नेले. तेथे जाऊन पीडित महिलेशी परिचय वाढविला. त्यानंतर पीडित महिलेसोबत काढलेले सेल्फी फोटो महिलेच्या पतीला पाठवून महिलेला लग्न मोडण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडित महिलेस वणी, त्र्यंबकेश्वर येथील लॉजवर नेऊन वेळोवेळी जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. या संबंधास महिलेने प्रतिकार केला असता तिला मारहाण व दमदाटी केली. हा प्रकार दि. 18 ते 28 डिसेंबर 2021 दरम्यान घडला. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार भद्रकाली पोलीस ठाण्यात मुंबईच्या व्यक्तीविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.
शेअर चॅटवरील मैत्री पडली महागात
One thought on “शेअर चॅटवरील मैत्री पडली महागात”
-
Pingback: रामनवमी उत्साहपूर्ण वातावरणात - Gavkari News