हसण्यासाठी जन्म आपुला!

आज 1 मे, महाराष्ट्र दिन, कामगार दिन व जागतिक हास्य दिन, असा त्रिवेणी संगम असलेला शुभ दिवस! त्या निमित्ताने…
हास्य जगद्गुरू डॉ. मदन कटारिया यांनी 13 मार्च 1995 साली मुंबई येथे केवळ पाच व्यक्तींना बरोबर घेऊन हास्ययोग सुरू केला. आज जगभरात 100 पेक्षा अधिक लोक या हास्ययोग चळवळीत सक्रिय आहेत. आनंदी व निरोगी जीवनासाठी हास्ययोगाची नितांत गरज आहे, याचा अनुभव सर्व हास्यप्रेमी घेत आहेत.
जागतिक हास्य दिन मे महिन्यातील पहिल्या रविवारी साजरा केला जातो. अखिल विश्‍वाला हास्य संजीवनी देणारे जगद्गुरू डॉ. मदन कटारिया यांनी सर्वप्रथम 10 मे 1998 साली मुंबईमध्ये हा दिवस जागतिक हास्य दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. आज जगभरातील शंभराहून अधिक देश हा दिवस एकत्रित येऊन ‘जागतिक हास्य दिन’ म्हणून साजरा करतात. एकमेकांना शुभेच्छा देतात.
मागील दोन वर्षे कोरोना संक्रमणामुळे सर्व हास्यक्लब बंद होते. सर्वांना एकत्र जमायला बंदी होती. परंतु पूर्वी केलेल्या हास्ययोगामुळे आपलं आरोग्याचं बचत खातं सुरक्षित होतं. त्यामुळे आपण सर्वजण कोरोना सेफ राहिलो आहोत. ही खरोखरच हास्ययोगाची किमया आहे.
हास्य मानवाला मिळालेलं अनोखं वरदान ! हसरं मूल, हसर्‍या व्यक्ती सर्वांना हव्याहव्याशा वाटतात. त्यांची सर्वांशी मैत्री होते. त्यांच्या प्रसन्न अशा व्यक्तिमत्त्वामुळे सर्वांवर प्रभाव पडतो. हास्य एकमेकांमध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित करतं. कारण..
हसण्याला नसते बंधन
हसण्याला नसते भाषा,
म्हणून तर..
वेदनांशी संवाद साधून
हसू दूर करते निराशा!
अशी ही जगाशी संवाद साधणारी हास्य ही एक भाषा आहे. चिंता, काळजी, निराशा, ताणतणाव यावर खळखळून हसणं हे प्रभावी टॉनिक आहे व ते विनामूल्य आहे.
ज्याच्या आयुष्यात हास्य असते, तो सदैव आनंदी, उत्साही व सकारात्मक असतो. रोजच्या जीवनात प्रचंड स्पर्धा, ताणतणाव याला प्रत्येक व्यक्तीला सामोरे जावे लागते. या सर्वांवर मात करून मन आनंदी व प्रसन्न ठेवण्यासाठी हास्याचं टॉनिक दररोज घ्यायलाच हवं.
हसणार्‍या व्यक्तींभोवती सदैव मित्र-मैत्रिणींची गर्दी असते. हसणार्‍या व्यक्ती जीवनात येणार्‍या कठीण प्रसंगावर सहजपणे मात करू शकतात. त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असतो. खळखळून हसल्यामुळे शरीराला भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. शरीरातील दूषित वायू बाहेर फेकले जातात. त्यामुळे दिवसभर मन उत्साही राहून थकवा जाणवत नाही.
आज हास्याचे महत्त्व सर्वांना समजल्यामुळे जगभरात हास्यक्लबचे जाळे पसरू लागले आहे.एकट्याने हसणे व समूहाने हसणे यात खूप फरक आहे. हास्य हे संसर्गजन्य आहे. एक जण हसू लागला की, सर्वजण एकमेकांकडे पाहून खळखळून हसू लागतात व आनंदी वातावरण तयार होते.
आपले हास्य जगद्गुरू डॉ. मदन कटारिया म्हणतात..र्डीप वशारपवी पे ीशरीेप ींे ीहळपश. थरींशी वशारपवी पे हसण्यासाठी जन्म आपुला !
ीशरीेप ींे षश्रेु लहळश्रव वशारपवी पे ीशरीेप ींे ीाळश्रश. थहू वे ुश पशशवी र ीशरीेप ींे श्रर्रीसह?
हसण्यासाठी कशाला हवंय कारण ? म्हणूनच प्रत्येक हास्यक्लबमध्ये सर्वजण विनाकारण खळखळून हसत असतात. हसण्याचा मनमुराद आनंद लुटत असतात.
हास्ययोगामध्ये हास्यही आहे व प्राणायाम देखील आहे. हास्य व योग यांचा समन्वय असल्याने याला हास्य योग असे म्हटले जाते. हो हो हा हा हा हा हास्ययोगाचा बीजमंत्र आहे. सर्वजण टाळ्या वाजवत हा बीज मंत्र म्हणतात. टाळ्यांमुळे प्रेशर क्रिया आपोआपच घडते. हास्य प्रकारांमध्ये विविध शारीरिक हालचाली आहेत. विविध हास्यप्रकार मनोरंजक पद्धतीने घेतले जातात. दीर्घश्‍वसनामुळे थकवा नाहीसा होऊन भरपूर प्रमाणात शरीराला ऑक्सिजन मिळतो. साधारणपणे सर्व हास्यप्रकार उभे राहून केले जातात. त्यामुळे एकमेकांचा डोळ्यांशी संपर्क होऊन आनंदी वातावरण तयार होते.
स्वतःचे व्यक्तिमत्त्व फुलवायचे असेल तर हास्यक्लबला जायलाच हवे. हास्ययोगाचे अनेक फायदे आहेत. एकाकी जीवन व्यतित करणार्‍या व्यक्ती स्वतःच्या जीवनातलं दु:ख विसरून छान ग्रुप मिळाल्याने आनंदी होतात.त्यांना मित्र..मैत्रिणींची साथ, आधार, विश्वास मिळतो. एकाकीपणाची भावना नाहीशी होते. हास्यक्लबमध्ये नेहमीच आनंददायी, खेळीमेळीचे वातावरण असते. प्रत्येकाला स्वतःमधील सुप्तगुण अभिव्यक्त करण्यासाठी व्यासपीठ मिळते. त्यामुळे कोणी कविता, गाणी, कोडी, विनोद, चुटकुले सांगून सर्वांची दाद मिळवतात. त्यामुळं आत्मविश्वास वाढतो.
कधीही स्टेजवर न आलेल्या व्यक्ती छान आत्मविश्वासाने विविध गुणदर्शन करतात. नाचतात, गातात. स्वतःबरोबर दुसर्‍यालाही आनंदी ठेवतात. हास्यक्लबमध्ये लहान-मोठे सगळेच बरोबरीच्या नात्याने वागतात. जात, धर्म, पंथ, गरीब, श्रीमंत या पलीकडचं मैत्रीचं नातं इथं प्रस्थापित होतं आणि माझा हास्यपरिवार ही भावना वृद्धिंगत होते.
सकाळी शुद्ध हवेत खळखळून हसल्याने भरपूर ऊर्जा मिळते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. झोप चांगली लागते. चेहर्‍याच्या स्नायूंना व्यायाम होतो. अंगातील प्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे संसर्गजन्य रोगांचा संसर्ग कमी प्रमाणात होतो. मेंदूचे आरोग्य सुधारल्यामुळे विस्मरण कमी होते. डायबेटिस, ब्लडप्रेशर यांच्या गोळ्याची मात्रा कमी होते. हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
मेमधील पहिल्या रविवारी जागतिक हास्यदिना दिवशी प्रत्येक शहरातील सर्व हास्यक्लब एकत्रित येतात. मोठी रॅली काढली जाते. विविध वेशभूषा, लेझीम पथके, हास्य घोषणा, हास्य गाणी यामुळे सर्व परिसर दुमदुमला जातो. आम्हा हास्यप्रेमींचा तो एक मोठा सणच असतो.
सामाजिक बांधिलकी जपण्यात हास्यक्लबचा नेहमीच सहभाग असतो. विविध वसतिगृहे, आश्रमशाळा, वृद्धाश्रम, डे केअर सेंटर अशा ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन विविध स्वरूपात मदतीचा हात सर्व हास्यक्लबचे सदस्य नेहमीच देतात.
हास्यक्लबमध्ये जास्त संख्या प्रौढ स्त्री- पुरुषांची असते. संसारातील जबाबदार्‍यांमधून थोडीशी मोकळीक मिळालेली असते. असे लोक हास्यक्लबमध्ये येऊन व्यायामाबरोबरच इतर उपक्रमांमध्ये सहभागी होतात. हसून खेळून जीवन सुंदर बनवतात.
हास्ययोग हा सर्वांगसुंदर व्यायाम आहे. त्यासाठी वेगळे पैसे मोजावे लागत नाहीत. हास्ययोगातील हास्यसाधना ही ज्येष्ठांसाठी नवसंजीवनी आहे. संध्याछाया भिवविती हृदया असा आयुष्यातील अंतिम टप्पा नव्या आशेनं, उत्साहानं, जोमानं, चैतन्यानं भारून टाकणारा जणू एक परीसच आहे. जीवन उजळून टाकणारा चैतन्य दीप आहे.
हास्ययोगातून विश्वशांती हे आपल्या हास्य महागुरू डॉ. मदन कटारिया यांचं स्वप्न आहे. त्यासाठी हास्य चळवळ सक्रिय होणं महत्त्वाचं आहे. आपण या चळवळीत सहभागी होऊन खारीचा वाटा उचलूया.
सविता एरंडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *