राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

होर्मुझच्या सामुद्रधुनीत हाहाकार!

♦ समुद्रात पेरलेल्या सुरुंगामुळे मालवाहू जहाजाला जलसमाधी
♦ 2,500 कंटेनर समुद्रात, जागतिक पुरवठा साखळी धोक्यात

नवी दिल्ली/दुबई 
जगाच्या एक पंचमांश तेल आणि गॅस वाहतूक होणार्‍या होर्मुझच्या सामुद्रधुनीत बुधवारी सकाळी मोठा स्फोट झाला. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने सांगितले की, अनधिकृत आणि धोकादायक मार्गाने जाण्याचा प्रयत्न करणारे एक कंटेनर जहाज नौदल सुरुंगाला धडकून पेटले आणि दक्षिण होर्मुझच्या पाण्यात बुडाले. या मालवाहू जहाजाला जलसमाधी मिळाल्याने 2,500 कंटेनर समुद्रात वाहून गेले. यामुळे जागतिक पुरवठा साखळी धोक्यात आली आहे.
आयआरजीसीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एक उल्लंघन करणारे कंटेनर जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीतून अनधिकृत मार्गाने जाण्याचा प्रयत्न करत होते. ते नौदल सुरुंगावर आदळले. स्फोट झाला आणि आग लागली. 2,500 हून अधिक कंटेनर घेऊन जाणारे जहाज बुधवारी सकाळी आगीच्या तीव्रतेमुळे बुडाले. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात जहाज कलंडताना आणि काळ्या धुराचा मोठा लोट उठताना दिसत आहे. समुद्रात शेकडो कंटेनर तरंगताना दिसत आहेत. आयआरजीसी ने स्थानिक मच्छिमार आणि बोटींना इशारा दिला आहे की, तरंगत्या कंटेनरला धडकू नये म्हणून सावधगिरी बाळगा.
दोन जहाजांवर हल्ला, एक बुडाले
सिंगापूरच्या मेरीटाईम अँड पोर्ट अथॉरिटीने पुष्टी केली की, सिंगापूर-नोंदणीकृत दोन जहाजांवर मंगळवार-बुधवारी हल्ला झाला. जीएफएस प्राईड या जहाजाला आग लागली आणि ते बुडाले. 21 क्रू मेंबर्सना सुरक्षित बाहेर काढण्यात आले, कोणीही जखमी नाही. जीएफएस जीसेल या जहाजाच्या बॉडीचे नुकसान झाले, पण ते स्वतःच्या इंजिनवर सुरक्षित ठिकाणी पोहोचले. 22 क्रू सुरक्षित आहेत. या दोन्ही जहाजांवर सिंगापूरचे नागरिक नव्हते. जीएफएस प्राईड हेच आयआरजीसी ने सांगितलेले 2,500 कंटेनरचे जहाज आहे का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही, पण वेळ आणि लोकेशन एकच आहे.
युद्धाचा भडका
आयआरजीसीने कालच इशारा दिला होता की, आम्ही होर्मुझवर 24 तास नियंत्रण ठेवत आहोत, अमेरिकेचे युद्धनौका जवळ आल्यास बुडवू. याला अमेरिकेच्या सेंटकॉमने प्रत्युत्तर दिले होते की, आयआरजीसी कमांडरकडे नौदलच नाही. होर्मुझवर नियंत्रण अमेरिकेचे आणि मित्र राष्ट्रांचे आहे. आम्ही कालच 1.9 कोटी बॅरल कच्चे तेल सुरक्षितपणे पुढे नेले. गेल्या 48 तासांत होर्मुझमध्ये किमान 5 जहाजांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. दोन जहाजांवर प्रोजेक्टाईल हल्ल्याचीही नोंद झाली आहे.

Havoc in the Strait of Hormuz!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

7 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

7 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

7 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

7 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

7 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

8 hours ago