त्याने बदलले तब्बल 65 सिमकार्ड, पोलिसही झाले चकित

पोलिसांपासून बचाव करण्यासाठी   त्याने बदलले तब्बल 65 सिमकार्ड

तीन वर्षांपासून फरार पोक्सो गुन्ह्यातील आरोपीला अटक

शहापूर: प्रतिनिधी

लहान मुलीवर लैंगिक अत्याचार करून ३ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर गुजरातमधून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपी त्याचे नाव बदलून पोलिसांचा समेमिरा चुकवत होता. तसेच त्याने अटक टाळण्यासाठी ६५ सिमकार्डचा वापर केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. या तीन वर्षांच्या काळात आरोपी गुजरात, राजस्थान, दिल्ली, उत्तरप्रदेश परिसरात परिसरात फिरत होता, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.कुर्ला येथील विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात १८ जुलै २०२२ मध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण व तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यांतील आरोपी नौशाद इसरार अहमद वय २२ वर्षे हा गुन्हा दाखल झाल्यापासून परराज्यात पळून गेला होता. तो रआपले अस्तित्त्व लपवून तीन वर्षांपासून गुजरात, राजस्थान, दिल्ली, उत्तरप्रदेश येथील विविध ठिकाणी वास्तव्याला होता. यावेळी त्याने स्वतःचे नाव व ओळखही बदलली होती. गेल्या तीन वर्षांंपासून आरोपीने पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी ६५ सिमकार्डचा वापर केला. त्याद्वारे तो पोलिसांना गुंगारा देत होता.आरोपीच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून व गुप्त बातमीदारामार्फत माहिती प्राप्त करून गुन्ह्यातील आरोपी हा गुजरातमधील पदमला परिसरातील कुरियर कंपनीच्या ट्रकवर चालक म्हणून कामाला असल्याचे समजले. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नौशादचा शोध घेण्यास सुरूवात केली. त्यावेळी तो गुजरात राजस्थान, दिल्ली, उत्तरप्रदेश येथे वारंवार प्रवास करीत असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार वारंवार तांत्रिक विश्लेषण करून गुन्ह्यातील नौशाद याची माहिती मिळवली. त्या माहितीच्या आधारे पोलीस पथक गुजरातमध्ये रवाना झाले. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी सापळा रचला. पथकाने सापळा लावल्यानंतर नौशादला पकडण्यासाठी घेराव घातला. त्यानंतर त्याला पोलीस पथकाने ताब्यात घेतले. यावेळी आरोपीची पडताळणी करण्यात आली असतो तो पोलिसांना पाहिजे असलेला आरोपीच असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याला याप्रकरणी अटक करून मुंबई आणण्यात आले. आरोपीने स्वतःची ओळख लपवण्यासाठी नाव व ओळखही बदली होती. तसेच पोलिसांचा समेमिरा चुकवण्यासाठी त्याने ६५ सिमकार्डचा वापर केला. ती सीमकार्ड आरोपीने कशी खरेदी केली याबाबतही पोलीस तपास करत आहेत. सर्व सिमकार्ड आरोपीने गुजरातमधून खरेदी केल्याचे निष्पन्न झाले असून त्याबाबतची माहिती लवकरच स्थानिक पोलिसांना देण्यात येणार आहे. यापूर्वीही आरोपीला अटक करण्यासाठी अनेकवेळा प्रयत्न करण्यात आले होते. पण आरोपी चालक असल्यामुळे विविध राज्यांमध्ये फिरत होता. त्यामुळे त्याचा माग काढणे कठीण झाले होते.

Bhagwat Udavant

Recent Posts

हिट अँड रन: शाळेत जाणाऱ्या मुलीचा डंपरच्या धडकेने मृत्यू

डम्परच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यातील चांदोरी जवळ आज दि…

17 hours ago

नाराजीनाट्याचा बुरखा

राजकारणात सध्या एक ट्रेंड सुरू असून, पक्षाला जोपर्यंत सुगीचे दिवस आहेत तोपर्यंत पक्षाशी आपण किती…

20 hours ago

आयारामांना पायघड्या; निष्ठावानांना संतरज्या!

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पक्षांतराला वेग आला आहे. प्रत्येक…

20 hours ago

अपेक्षांच्या बळी मुली

नीट परीक्षेत अपेक्षेइतके गुण मिळाले नाहीत म्हणून साधना भोसले या पोटच्या मुलीला मुख्याध्यापक असलेल्या पित्याने…

20 hours ago

अश्व धावले रिंगणी

इंदापुरात अविस्मरणीय रिंगण सोहळा इंदापूर : पंढरपूरला निघालेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा काल…

20 hours ago

साप्ताहिक राशिभविष्य

दि. 29 जून ते 5 जुलै 2025 पुरुषोत्तम नाईक मेष : मंगलवार्ता कळतील या सप्ताहात…

21 hours ago