महाराष्ट्र

तो जेव्हा ती होते

तो जेव्हा ती होते…
सविता दरेकर
हा जीवनपट वाचकांनी नक्की आत्मीयतेने स्वागत करून वाचावा व हा अंतरीचा हुंकार पचवण्याची क्षमता ठेवून या लेखमालेचे स्वागत करावे हीच या लेखणीची अपेक्षा… धन्यवाद!
काय बोलू गं ताई, आठवले तरी कसेतरी  चुकल्यासारखे होते… एका विचित्र वळणावर आयुष्य येऊन ठेपलं होतं गं ताई माझं!
अगं दीपिका, मला सांग, तुझ्या आयुष्यात एवढे चढउतार आले. मग वाट चुकत होती हे तुला कळत असूनही तू घरात बोलली का नाही… की, तुझ्या दैनंदिन आयुष्यात काय घडतंय ते?
कसं बोलणार ना, माझं बाहेर निघणं बंद झालं तर ….अशी भीती होती मनात…! माझं मलाच कळत नव्हतं काय चाललंय ते….काय चूक, काय छान उमजत नव्हतं गं तेव्हा…! मी साधारण दहावीत असताना…माझ्या शाळेतील एका सरांकडे मला आणि माझ्या बहिणीला कंप्युटर क्लास लावला होता…
मी शकुंतला नाटक केले तेव्हापासून ते सर मला चांगलंच आपुलकीने ओळखत होते. भेटले की माझे कौतुक करत असे…नंतर त्यांनी कंप्युटर घेतले व विद्यार्थ्यांसाठी क्लास सुरू केले. ते कपल नवीन लग्न झालेलं होतं..सरांच्या मिसेसही बँकेत नोकरी करत होत्या…लहान बहीण आणि मी शाळा सुटली की, सरांच्या घरी सोबतच क्लासला जात होतो… काही दिवसांतच नकळत हळूहळू टीचरचं मन लावून शिकवणं गोड बोलणं मला आकर्षित करू लागलं…आणि सरही माझ्याकडे सतत एकटक बघत असल्याचे मला जाणवत रहायचे…  काही दिवसांनी माझ्या ताईने क्लासचा टाइम बदलला …मग मी सकाळची शाळा सुटली की, सरांसोबत दुपारी स्कूटरवर त्यांच्या घरी क्लासला जाऊ लागलो…   तेव्हा भरभर वाहणारा तो गारवा गालाला स्पर्शून मला रोमांचित करायचा…
नकळत सरांना चिकटून बसताना काहीसं छान वाटायचं मनाला…काय वाटतंय ते मात्र उमजत नव्हतं.. दोन पुरुष सोबत जाताना कोण कशाला नावं ठेवेन म्हणून सरही विरोध करत नसे..आणि कौतुकाने झाडावर चढवत असे…
तू हुशार आहे. दीपक मी सांगितले ते सारं पटकन शिकतोस..तू अजून अभ्यास वाढव, हुशार हो वगैरे…
मी एकटा असायचो. सर खुर्चीत बसवून कधी मांडीवर बसवून हात पकडून कंप्युटर शिकवू लागले..तेव्हा नवीनच होतं कंप्युटर ..गावात फक्त सरांकडे होतं.
सरांनी हाताला स्पर्श केला की, मला विरोध करावा वाटत नसे..जणू वयात आलेल्या मुलींच्या मनात येणार्‍या फिलिंग मलाही जाणवू लागल्या होत्या… काही दिवसांत हळूहळू सर मला बेडरूममधले मॅडमचे कपाट दाखवत आणि  साड्या दाखवून त्या घालून बघायला सांगायचे…
शकुंतला रोलमध्ये तू किती छान दिसायचा. दीपक आता साडी घालून बघं बरं छान दिसतो…
मला घरात विरोध असल्याने आणि इथे कुणी रागवणारं नव्हतं. मग मी हौसेने साडी घालून बसत कंप्युटर शिकत होतो.. पण सर माझ्यात स्रीभावना शोधत होते..हे मला जाणवले..ते नको तिथे स्पर्श करू लागले. मला ते सारं नकोसे झाले..आणि एक दिवस नकळत सर माझ्यावर जबरदस्ती करत असतानाच अचानक मॅडम घरी आल्या..मला साडीत आणि सरांना पोरकटपणा करताना बघून त्या दोघांचे कडक भांडण झाले..
मला काही कळेना मी कोपर्‍यात बसून रडत होतो…मग काही वेळाने भांडण थांबवत ..माझ्याकडे येऊन मॅडमने शांतपणे मला घाबरू नको म्हणत सावरलं..मी कपडे आवरले आणि अपराधीपणा वाटून गप्प बसलो…
त्या बाईने मला छान चहा, नास्ता खाऊ घातला..मनातली भीती काढली. जणू काही घडलेच नाही असे दाखवत होती..
आणि म्हणाली, बाहेर कुठे असे काही घडले हे बोलू नको दीपक…उगाच लोक तुला त्रास देतील. समजतंय ना तुला मी काय सांगतेय …चल मी घरी पोहचवते तुला…
मी काय बोलणार निःशब्द.. ती बिचारी तिचा संसार वाचवत होती ….आणि मी एक नवा धडा गिरवत होता ज्याला इज्जत म्हणतात..
आम्ही निमूटपणे घरी आलो..मॅडमने मला म्हणाल्या, हे बघ दीपक टेन्शन घेऊ नको. काही झालेलं नाही ..मी वेळेवर पोहचले म्हणून तू सुखरूप आहेस… पण आयुष्यात स्वतःला सांभाळायला शिक दीपक ..असे म्हणत मला आईकडे पोहचवत ती माऊली घरी गेली..!
घरी आक्काने मला विचारले काय झाले ..असा का नाराज आणि घाबरलेला दिसतोय…आक्कापुढे मी सतत नतमस्तक होत होतो..ती बरोबर माझ्या चेहर्‍यावरचे भाव वाचून टाकायची…मग मी सर्व खरंखरं सांगून टाकले…गेले काही महिने सर कसे जवळीकता साधत होते…मला नको ते चित्र, व्हिडिओ कंप्युटरवर दाखवत होते…कुणाला सांगू नको, असेही बजावत असे..वगैरे वगैरे …
मग मात्र माझा क्लास बंद झाला तो कायमचाच..! पण, बदनामी नको म्हणून आठच दिवसांत सर व मॅडमने ते गाव सोडले…ते पुन्हा कधी परतलेच नाही….
आता मी दहावीचा अभ्यास करू लागलो आणि पास होऊन कॉलेजला अकरावीत प्रवेश घेतला आणि नवी दुनिया अनुभवायला सुरवात झाली… मी मुला-मुलींच्या घोळक्यात कृष्णसखा झालो होतो…मुली सहज माझ्याशी मैत्री करत मनातलं बोलत…माझं दिसणं, स्वभाव त्यांना भावत होतं…कॉलेजला अनेक ड्रामा, नाटकं रंगवू लागलो..मी स्पेशल मराठी विषय घेतला होता..कथा-कादंबर्‍या माझे आवडते विषय झाले..घरात एवढ्या बहिणी पण मलाच जास्त मित्र-मैत्रिणींचे फोन येत असे…मुली म्हणायच्या दीपक तू किती क्युट दिसतोस …किती गोड बोलतोस, आम्हाला फार आवडतो वगैरे वगैरे…
पण मी मुलांसारखंच रहाणीमान ठेवलेलं  होतं म्हणून कुणाला माझ्यातले बदल फारसे कळत नव्हते…पण माझ्या अंतर्मनात मात्र मुलगी जिवंत होती…दीपक सतत फक्त दबावात असायचा…मनमोकळं कधी जगताच येईना…
मला काय हवंय, आयुष्यात काय करायचंय हे मला कुणी समजून घेत नव्हतं..म्हणून आतून एकाकीपण खायला उठायचं…पण अशा वेळी आक्का कायम समजुन घ्यायची ..वेळेला समज द्यायची..मग बरं वाटायचं…!
असेच कालेजचे वर्ष संपत आले होते…आता मी पदवीधर होणार होतो…नाटकात कामं करणं वाढलं होतं..आता कामाचे पैसे मिळत होते. कुणाकडे मागावे लागत नव्हते आणि असंच अचानक नाटक कंपनीतच माझ्या आयुष्यात पुन्हा एका व्यक्तीने एन्ट्री केली …!
(क्रमशः पुढच्या भागात..)
Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

15 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

15 hours ago