आस्वाद

’रामायण’ची आधुनिक झेप

– मनीषा चौधरी

चित्रपटसृष्टीत सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे तो म्हणजे, नितेश तिवारी दिग्दर्शित आणि नमित मल्होत्रानिर्मित बिग बजेट चित्रपट ’रामायण ः पार्ट 1’. पौराणिक कथांवर आधारित चित्रपट आजही नवीन पिढीला तितकेच आकर्षित करतात, हे या चित्रपटाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. ’रामायण’ हे महाकाव्य सर्वांनाच परिचित आहे, यावर आजवर अनेक नाटके, मालिका आणि चित्रपट येऊन गेले आहेत. तरीही नोव्हेंबर 2026 मध्ये दिवाळीच्या सुट्ट्यांच्या मुहूर्तावर विविध भाषांत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटास पहिल्याच आठवड्यापासून प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली असून, प्रदर्शनाच्या अवघ्या बारा दिवसांत जगभरात 1,400 कोटींहून अधिक कमाई करत बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचला आहे. महाकाव्याची आधुनिक झेप असेच या चित्रपटाचे वर्णन करायला हवे.
या प्रचंड यशामागे दिग्दर्शक नितेश तिवारी यांची संयत आणि प्रभावी मांडणी आहे. यापूर्वी आलेल्या काही पौराणिक चित्रपटांच्या अपयशानंतर प्रेक्षकांच्या मनात साशंकता होती, मात्र, ’रामायण: पार्ट 1’ ने ती पूर्णपणे दूर केली. तीन तास 15 मिनिटांच्या या चित्रपटात केवळ श्रीरामांचा वनवास दाखवलेला नाही, तर रावणाचा उदय आणि त्याची पार्श्वभूमीही समांतरपणे गुंफली आहे. काही ठिकाणी कथानकाचा वेग काहीसा संथ वाटत असला, तरी पटकथेतील भावनिक खोली प्रेक्षकांना खिळवून ठेवते. काही भिन्न मतमतांनतरे असली तरी रामायण चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील गरुडझेप दुर्लक्षित होऊ शकत नाही.
कोणत्याही पौराणिक चित्रपटाचे यश हे कलाकारांच्या निवडीवर अवलंबून असते. रणबीर कपूरने आपल्या आजवरच्या आक्रमक प्रतिमांना छेद देत अत्यंत संयमी, शांत आणि मर्यादाशील श्रीराम साकारले आहेत. संवादांपेक्षा आपल्या डोळ्यांतून बोलणारा त्याचा अभिनय लक्ष वेधून घेतो. त्याला तितकीच तोलामोलाची साथ साई पल्लवीने दिली आहे. तिचा नैसर्गिक अभिनय आणि निरागसता माता सीतेच्या पात्राला एक वेगळीच उंची देऊन जाते. दुसरीकडे, रावणाच्या भूमिकेत यशची स्क्रीन-स्पेस म्हणजेच चित्रपटातील त्याची दृश्यसंख्या तुलनेने कमी असली, तरी त्याचा करारीपणा आणि दहा तोंडांचे दृश्य पडद्यावर एक वेगळीच ऊर्जा निर्माण करते. रवी दुबे (लक्ष्मण), अरुण गोविल (दशरथ) आणि जटायूला आवाज देणारे अनुपम खेर यांनी कथेला भक्कम आधार दिला आहे.
तांत्रिक आघाडीवर हा चित्रपट भारतीय सिनेमाचा नवा मानदंड ठरला आहे. चित्रपटातील व्हिज्युअल इफेक्ट्स डोळ्यांचे पारणे फेडणारे आहेत. विशेषतः जटायू आणि रावणाच्या युद्धाचे दृश्य थक्क करणारे आहे. संगीताच्या बाबतीत ऑस्कर विजेते हॅन्स झिमर आणि ए. आर. रहमान यांची जुगलबंदीपाश्चात्य ऑर्केस्ट्रा आणि भारतीय शास्त्रीय संगीताचा अद्भुत संगम घडवते. गाणी अधिक लक्षात राहणारी हवी होती असे काहींना वाटू शकते, पण पाश्वर्र्संगीत चित्रपटाची भव्यता अनेक पटींनी वाढवते.
बॉक्स ऑफिसचे अर्थकारण लक्षात घेतले तर आपल्या लक्षात येते की, या चित्रपटाने ’ठठठ’, ’घॠऋ2’ आणि ’कल्की 2898 एडी’ यांसारख्या दिग्गज चित्रपटांच्या लाइफटाइम कमाईला अवघ्या दोन आठवड्यांत मागे टाकले आहे. परदेशात पाचशे कोटींहून अधिक कमाई करत भारतीय संस्कृतीचा हा वारसा जागतिक स्तरावर पोहोचला आहे. अर्थात, दोन्ही भाग मिळून सुमारे 4,000 कोटींचे अवाढव्य बजेट असल्याने, खर्‍या अर्थाने नफ्याचे गणित जुळवण्याची मोठी जबाबदारी आता दुसर्‍या भागावर असेल. एकंदरीत, ’रामायण ः पार्ट 1’ हा केवळ मनोरंजन करणारा चित्रपट नसून, भारतीय ’सॉफ्ट पॉवर’ आणि तांत्रिक क्षमतेचे भव्य दर्शन आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आपली मुळे आणि संस्कृती नवीन पिढीपर्यंत कशी पोहोचवता येते, याचा हा एक उत्तम वस्तुपाठ आहे. पहिल्या भागाने निर्माण केलेली ही जादू आता ’रामायण ः पार्ट 2’ची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

The modern take on ‘Ramayana’

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

आखिर कब तक चुप रहेगी?

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः। यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः॥ भावार्थ : जिथे स्त्रीचा…

9 minutes ago

व्हिटॅमिन बी-12 च्या मदतीने केली नवी रिचार्जेबल बॅटरी

- डॉ. किशोर पवार मानवी शरीरासाठी जीवनसत्त्वाचे महत्त्व किती अनन्यसाधारण आहे याची कल्पना सर्वांनाच आहे.…

22 minutes ago

आत्महत्या हा उपाय नाही…

- ज्योती काळे-जाधव अलीकडच्या काळात घडणार्‍या आत्महत्यांच्या घटना मनाला अस्वस्थ करून जातात. पुण्याची पायल, काल…

28 minutes ago

दिवाळी संपली; फराळाच्या आठवणी कायम

- प्रणाली देशमुख तसा खूप मोठा परिवार आहे यांचा! पिढ्यान्पिढ्या आपल्याला अगदी मनपसंद, चमचमीत, तिखट-गोड…

32 minutes ago

दिशादर्शकांवर ‘भाऊ-दादां’ची मक्तेदारी!

- वाहिद बागवान रस्ता कुठे जातो, हे सांगण्यासाठी उभारलेल्या दिशादर्शक कमानींवर आता कोणत्या नेत्याचा वाढदिवस…

36 minutes ago

‘एफडीए’ला आली जाग…

गेल्या काही दिवसापासून अत्यंत नावाजलेल्या अशा खाद्यपदार्थांच्या दुकानांचं नाव समोर आले, का तर म्हणे ’एफडीए’च्या…

42 minutes ago