30 सप्टेंबरला पुढील सुनावणी
सिडको : प्रतिनिधी
महिलांचे लैंगिक शोषण तसेच आर्थिक फसवणुकीच्या विविध गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या अशोक खरातच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी होणार होती. मात्र, नियमित न्यायालय रजेवर असल्याने दुसर्या न्यायालयात ही सुनावणी पार पडली. आता या अर्जावर 30 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी
होणार आहे.
खरातविरुद्ध दाखल असलेल्या एका गुन्ह्यात जामीन मिळावा, यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे. या अर्जावरील सुनावणी सलग दुसर्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम
उपस्थित होते.
दरम्यान, अशोक खरात सध्या मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्याविरुद्ध दाखल विविध गुन्ह्यांचा तपास विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) सुरू आहे. जामीन अर्जावरील पुढील सुनावणी 30 सप्टेंबर रोजी होणार असल्याने त्याकडे लक्ष लागले आहे.
Hearing on Kharat’s bail application adjourned again.