पुणे प्रतिनिधी :
गेल्या दोन दिवसापासून राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर वाढला असून, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणि घाटमाथ्यावर दमदार हजेरी लावली असल्याने पाणीसाठा वाढण्यास मदत झाली आहे. त्यातच सततच्या पावसामुळे सूर्यदर्शन झाले नाही.
पुणे शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातदेखील जोरदार पाऊस सुरू आहे. राज्याच्या विविध भागांत म्हणजेच कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांत येत्या दोन-तीन दिवसांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर दमदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कृष्णा व भीमा खोर्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रातदेखील पावसाचा जोर वाढला असून, खडकवासला धरण साखळीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदतच झाली आहे.
दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार मॉन्सूनने महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, पश्चिम बंगाल, सिक्कीमचा काही भाग व्यापला असून, त्याच्या पुढील वाटचालीसाठी पोषक वातावरण असल्याचे स्पष्ट केले आहे. पुणे शहर परिसरात आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातदेखील पावसाचा जोर वाढला असून, सखल भागात पाणी साचल्याने तसेच काही भागात रस्त्यांची कामे सुरू असून वाहतुकीस वेळ लागत आहे. काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…