नाशिक

भावली खुर्द येथे जलकुंभाचे लोकार्पण

इगतपुरी : प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील भावली खुर्द येथे जलकुंभाचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. भावली खुर्द ग्रामपंचायतीमधील तांबडमाळ या आदिवासी वस्तीत ज्ञानप्रबोधिनी संस्थेतर्फे बांधण्यात आलेल्या जलकुंभाचे लोकार्पण रोटरी क्लब ऑफ नाशिक ग्रेप सिटीच्या अध्यक्षा मधुवंती सिद्धये यांच्या हस्ते झाले.
यावेळी ज्ञान प्रबोधिनीचे स्वामी देवसेवानंद, ग्रामसेविका रूपाली जाधव, रोटरी क्लबच्या सचिव जयश्री पाटील, सदस्य आशा वेणुगोपाल, अंजली मेहता, दुर्गा साली, अच्छमा अलूर, मीना जैन, मेधा पुणतांबेकर, अमित घरटे व ग्रामस्थ उपस्थित होते.
तांबडमाळ येथील 15 हजार लिटर क्षमतेची साठवण टाकी (जलकुंभ) लोकांच्या पुढाकाराने व सहभागाने बांधण्यात आली आहे. यासाठी रोटरी क्लब ऑफ ग्रेप सिटीतर्फे दीड लाखाचे अर्थसहाय्य लाभले. या छोट्या आदिवासी वस्तीची लोकसंख्या अंदाजे 75 च्या आसपास आहे. या जलकुंभामुळे ग्रामस्थ व जनावरांना फायदा होईल.
पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या ग्राम विकसन विभागातर्फे आत्तापर्यंत इगतपुरी तालुक्यात आठ, त्र्यंबकेश्वर तालुक्यात नऊ, तर पेठ तालुक्यात चौदा पाणी साठवण टाक्या गेल्या दोन वर्षांत बांधण्यात आल्या आहेत. यासाठी पर्यावरणपूरक फेरोसिमेंट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. उन्हाळ्यातील टंचाई काळात दुर्गम व डोंगराळ भागातील आदिवासी पाड्यांना या पाणी साठवण टाक्या उपयोगी ठरत आहेत.
यावेळी रोटरी क्लब ऑफ नाशिक ग्रेप सिटीचे पदाधिकारी व सदस्यांनी महिलांसाठी पाण्याचे कष्ट कमी झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले व उपलब्ध पाणी काटकसरीने व जपून वापरण्याचे ग्रामस्थांना आवाहन केले.

 

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

11 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

11 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

11 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

11 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

11 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

12 hours ago