नाशिक : प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव येथील तरुणाचा भर रस्त्यात तरुणाचा कोयत्याने वार करत आणि बंदुकीतून गोळ्या झाडत खून करण्यात आल्याची घटना घडली. ऐन अक्षय तृतीयेच्या दिवशीच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. चुलत भावानेच गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती आहे.
मुंबई आग्रा महामार्गावर राजूर फाटा येथे ही घटना झाली आहे. भुषण लहामगे असे दुर्दैवी युवकाचे नाव असून तो जिल्हा स्तरीय कुस्तीपटू असल्याचे समजते. कोयत्याने वार आणि गोळी घालून ही हत्या झाल्याचे समजते. बंदुकीचे तीन चार राऊंड फायर झाले असल्याची या भागात चर्चा आहे. युवकाची हत्या करून अज्ञात मारेकरी फरार झाले आहेत. वाडीवहे आणि ग्रामीण पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले आहे. मारेकऱ्यांचा पोलीस कसून शोध घेत आहे.
आरक्षण जीआरवरून एकमेकांवर टीका मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि मंत्री…
- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…
- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…
महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…
बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…