मेहेंदी आणि हेअर कलर

वैज्ञानिक दृष्टिकोनातून योग्य निवड कशी कराल?

केस रंगवण्यासाठी आजकाल बाजारात नैसर्गिक मेहेंदीपासून ते केमिकल हेअर कलरपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण यातील कोणता पर्याय सुरक्षित आहे आणि कोणता केसांसाठी हानिकारक, हे समजून घेणे गरजेचे आहे.
नैसर्गिक मेहेंदी
शुद्ध मेहेंदीमध्ये लॉसोन नावाचा नैसर्गिक रंगद्रव्य घटक असतो, जो केसांच्या क्युटिकल लेयरला हलकासा कोट करून तांबूस-केशरी छटा देतो. ही मेहेंदी केसांना नैसर्गिक कंडिशनिंग देते, स्काल्प थंड ठेवते आणि केसांची मुळे मजबूत करते. मात्र, शुद्ध मेहंदीचा रंग मर्यादित असतो – फक्त तांबूस किंवा केशरी छटा मिळते, काळा किंवा गडद ब्राऊन रंग मिळत नाही.
‘ब्लॅक मेहेंदी’ – सावधान!
बाजारात मिळणारी इन्स्टंट ब्लॅक मेहेंदी खरी मेहेंदी नसते. यात पॅरा-फेनिलीनेडायमिन नावाचे तीव्र केमिकल मिसळलेले असते, जे झटपट काळा रंग देते. पीपीडीमुळे स्काल्पवर अ‍ॅलर्जी, खाज, जळजळ, सूज आणि गंभीर प्रकरणांत त्वचेची तीव्र प्रतिक्रिया होऊ शकते. हे केसांच्या मुळांनाही कमजोर करते.
केमिकल हेअर कलर
यामध्ये अमोनिया आणि हायड्रोजन पेरॉक्साइड वापरून केसांचा क्युटिकल उघडला जातो आणि आत रंग बसवला जातो. योग्य प्रमाणात आणि प्रशिक्षित व्यावसायिकाकडून लावल्यास हे तुलनेने सुरक्षित असते, पण जास्त वापर केल्यास केस कोरडे, ठिसूळ होतात आणि स्काल्पचे नैसर्गिक तेल कमी होते.
अमोनिया-फ्री आणि हर्बल कलर
हल्ली बाजारात अमोनिया-फ्री आणि हर्बल-इन्फ्युज्ड कलर्स उपलब्ध आहेत, जे केमिकल नुकसान कमी करतात आणि नैसर्गिक तेलांसोबत काम करतात. हे संवेदनशील स्काल्प असणार्‍यांसाठी चांगला पर्याय आहे.

चांगली मेहेंदी कशी ओळखावी?
* रंग फिकट तांबूस-तपकिरी असेल, गडद काळा नसेल.
* लावल्यावर जळजळ किंवा खाज होत नाही.
* पॅकेटवर’PPD-free’ किंवा ‘Pure Lawsonia Inermis’लिहिलेले असावं.
* कोणताही नवीन रंग वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे अत्यंत आवश्यक आहे. वारंवार केस रंगवणार्‍यांनी दर 6-8 आठवड्यांचे अंतर ठेवावे आणि हेअर स्पा किंवा प्रोटीन ट्रीटमेंटने केस पोषण द्यावे.

Henna and Hair Color

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *